मुंबईची खबर : मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार ड्रायव्हरलेस मेट्रो, काय आहे प्लॅन?

मुंबई तक

• 03:56 PM • 16 Oct 2026

मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबईत चालकरहित मेट्रो सुरु होणार आहे. यातील पहिल्या चालकरहित मेट्रो ट्रेनसेटचे अनावरण करण्यात आले आहे.

Mumbai News

Mumbai News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

मुंबईत दाखल होणार ड्रायव्हरलेस मेट्रो

point

कधी सुरु होणार?

Mumbai News : मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. लवकरच मुंबईकरांना चालकरहित (ड्रायव्हरलेस) मेट्रोतून  प्रवासाची संधी मिळणार आहे. यासंबंधी एक मोठा टप्पा पार पडला आहे. वडाळा ते ठाण्यातील कासारवडवली दरम्यान धावणाऱ्या 32.32 किलोमीटर लांबीच्या कॉरिडॉरसाठी 39 मेट्रो ट्रेनसेट तयार केले जात आहेत. यातील  पहिल्या चालकरहित मेट्रो ट्रेनसेटचे अनावरण केले आहे. अल्सॉम (Alstom) कंपनीने आंध्र प्रदेशातील श्री सिटी येथे हे अनावरण केले. मुंबईच्या पूर्व उपनगरांमधून ठाण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

हे वाचलं का?

मुंबईत कधी दाखल होणार?

कंपनीने केवळ 14 महिन्यांच्या विक्रमी वेळेत या पहिल्या ट्रेनसेटचे उत्पादन केले आहे. एल अॅण्ड टी कंपनीसोबत झालेल्या करारानुसार अल्सॉम 39 मानवरहित मेट्रो गाड्या, सिग्नलिंग यंत्रणा, डेपो उपकरणे आणि पाच वर्षांची देखभाल सेवा पुरवत आहे. हा पहिला ट्रेनसेट नोव्हेंबरच्या अखेरीस पाठवला जाण्याची आणि डिसेंबरच्या मध्यापर्यंत मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तो चाचण्या आणि सुरक्षा प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेतून जाईल.

हे ही वाचा : गडचिरोली : कंत्राटदाराकडून लाच घेताना रंगेहात पकडलं, भाजपचा नगरसेवक ACB च्या जाळ्यात

सायकलसाठी विशेष सुविधा

'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत तयार झाला आहे. या मेट्रोचा कमाल वेग ताशी 90 किलोमीटर तर प्रत्यक्ष चालवण्याचा वेग ताशी 80 किलोमीटर असणार आहे. प्रवाशांसाठी यामध्ये व्हीलचेअरसाठी जागा, वातानुकूलित यंत्रणा आणि भारतात पहिल्यांदाच सायकलसाठी विशेष रॅकची सुविधा देण्यात आली आहे.

हे ही वाचा : पुण्यातील संदीप हॉटेलवर आयकर विभागाची छापेमारी, जाणून घ्या कारवाईचा संपूर्ण तपशील

मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा ताण  होणार कमी

मुंबईत दाखल झाल्यानंतर हा ट्रेनसेट रिसर्च डिझाईन्स अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन (RDSO) आणि मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (CMRS) यांच्यामार्फत विविध चाचण्या आणि सुरक्षा प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेतून जाईल. पायाभूत सुविधांचे काम, प्रणालींचे एकत्रीकरण आणि आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर या मार्गिकेवरील प्रवासी सेवा सुरू होईल. या कॉरिडॉरमुळे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा ताण कमी होऊन मुंबई-ठाणे दरम्यानचा प्रवास अधिक सुलभ होईल.