Maharashtra Weather : राज्यात दसऱ्याआधी धो धो बरसणार, IMD चा अलर्ट

मुंबई तक

• 05:00 AM • 19 Oct 2026

Maharashtra Weather : राज्यात सध्या उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता आहे. काहीच भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पावसाचा अंदाज वर्तविलेला आहे, जाणून घ्या एकूण हवामानाचा अंदाज.

mumbai monsoon update 2026 monsoon finally arrives where are rain warnings issued imd alert for maharashtra 24 june 2026 weather

प्रातिनिधीक फोटो

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

 राज्यात सध्या उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता

point

काहीच भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पावसाचा अंदाज

Maharashtra Weather : राज्यात सध्या उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता आहे. काहीच भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पावसाचा अंदाज वर्तविलेला आहे, तर बहुतांश ठिकाणी राज्यात कोरडे हवामान राहील अशी शक्यता वर्तवलेली आहे. अशातच जाणून घेऊयात 19 ऑक्टोबर 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'माझा नवरा नपुंसक असल्याने सासरा नको तेच..', सुनेचा धक्कादायक आरोप

कोकण

कोकणात मुंबई, पालघर, ठाणे येथे हवामान कोरडे राहणार आहे, तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. या तिन्ही जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे.

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाटमाथा परिसरात कोरड्या हवामानाची शक्यता आहे, तर अहिल्यानगर येथे मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रात पुणे, पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, सातारा घाटमाथा, सांगली या जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे, तर सोलापूर येथे हलका ते मध्यम मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. 

मराठवाडा 

मराठवाडा विभागात बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्टचा अंदाज वर्तविलेला आहे. तर नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. जालना आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांत हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. 

हे ही वाचा : पतीच्या डोळ्यादेखत वाघाने पत्नीवर केला हल्ला, नवरा बघतच राहिला अन्..

विदर्भ 

अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांत हवामान विभागाने कोणताही अलर्ट वर्तविलेला नाही. नागपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांत विजेच्या कडकडाटासह वादळ, काही विखुरलेल्या ठिकाणी पावसाची दाट शक्यता आहे. या दोन जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे.