वाशीम : ZP शिक्षक विद्यार्थीनींना करायचा चुकीचा स्पर्श, शिक्षिकेमुळे सगळं उघडकीस
washim crime news : वाशिममधील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाविरोधात नऊ वर्षांच्या विद्यार्थिनीच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थिनी आणि इतर मुलींना अभ्यासाच्या बहाण्याने जवळ बोलावून चुकीचा स्पर्श केल्याचा आरोप असून आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
वाशीम : ZP शिक्षक विद्यार्थीनींना करायचा चुकीचा स्पर्श
शिक्षिकेमुळे सगळं उघडकीस
Washim Crime News, जका खान : वाशिम जिल्ह्यात नऊ वर्षांच्या विद्यार्थीनीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाविरोधात लैंगिक अत्याचार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थीनी आणि तिच्या वर्गातील इतर मुलींना अभ्यास सांगण्याच्या बहाण्याने जवळ येत चुकीचा स्पर्श केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी शिक्षक दिलीप बोरकर याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा : वेदर रिपोर्ट : मराठवाड्याला दिलासा मिळणार? कोणत्या तारखांना मुसळधार पाऊस?
विद्यार्थीनी रडत शिक्षिकेकडे आली अन् सगळं उघडकीस
मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनीने काही दिवसांपूर्वी घरी आईला शाळेतील शिक्षक चुकीचा स्पर्श करत असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यावेळी आईने तिच्या बोलण्याकडे अधिक लक्ष दिले नव्हते. 9 सप्टेंबर रोजी विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत गेली होती. दुपारी सुमारे तीन वाजता शाळेतील एका शिक्षिकेने विद्यार्थिनीच्या आईला फोन करून तातडीने शाळेत बोलावले. विद्यार्थीनी रडत शिक्षिकेकडे आली आणि शिक्षिकेने शाळेतून जाऊ नये, असे तिला सांगितले. त्यानंतर कारण विचारले असता विद्यार्थीनीने शिक्षकाच्या कथित गैरवर्तनाबाबत शिक्षिकेला सांगितले.
हेही वाचा : 'शर्करावगुंठित'.., विद्यानंद बापटांनी पेटऱ्यातून नवा शब्द काढला, अर्थ आहे तरी काय?
