'शर्करावगुंठित'.., विद्यानंद बापटांनी पेटऱ्यातून नवा शब्द काढला, अर्थ आहे तरी काय?
vidyanand bapat interview : विद्यानंद बापट यांनी ध्वनिप्रदूषणाविरोधात पुण्यात आवाज उठवला आणि ते प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यांच्या मराठी भाषेवर असलेल्या प्रभुत्वाची देखील महाराष्ट्रात चर्चा आहे. त्यांनी 'शर्करावगुंठित' हा नवीन शब्द वापरलाय. त्याचा अर्थ काय समजून घेऊयात..
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'शर्करावगुंठित'.., विद्यानंद बापटांनी पेटऱ्यातून नवा शब्द काढला,
'शर्करावगुंठित' या शब्दाचा अर्थ आहे तरी काय?
vidyanand bapat interview : पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवात होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाविरोधात आणि डीजेच्या वापराच्या विरोधात आवाज उठवणारे जागृक नागरीक विद्यानंद बापट यांनी मुंबई Tak च्या चावडीवर 'शर्करावगुंठित' हा अत्यंत मार्मिक आणि नवा शब्द वापरून सण-उत्सवांच्या नावाखाली चालणाऱ्या गैरप्रकारांवर परखड भाष्य केले आहे. डीजेचा कर्णकर्कश आवाज, उत्सवांची परंपरा आणि तरुणाईचा उत्साह या सर्व मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर चर्चा केली. कायद्याची चौकट मोडून आणि नागरिकांच्या शांततेचा अधिकार डावलून सार्वजनिक ठिकाणी केला जाणारा गोंगाट हा अत्यंत चुकीचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
'शर्करावगुंठित' या शब्दाचा अर्थ काय?
सणांच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी जो धुडगूस घातला जातो आणि ध्वनी प्रदूषण केले जाते, त्याला धार्मिक वलय किंवा आवरण देण्याच्या प्रवृत्तीवर बापटांनी बोट ठेवले. याविषयी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, जेव्हा एखादी वाईट गोष्ट किंवा नियमबाह्य कृती उघडपणे युक्तिवादाने पटवून देता येत नाही, तेव्हा त्याला धर्माचा आधार दिला जातो. इंग्रजीत ज्याला 'शुगर कोटेड' किंवा साखरेचे आवरण दिलेले म्हणतात, त्याच गोष्टीसाठी त्यांनी 'शर्करावगुंठित' हा मराठी शब्द वापरला आहे. धर्मस्वातंत्र्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, मात्र या स्वातंत्र्याच्या नावाखाली इतर नागरिकांच्या शांततेत जगण्याच्या अधिकारावर गदा आणली जाणे पूर्णपणे अयोग्य असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : Personal Finance: CTC मोठा, पण हातात पगार कमी! Salary Slip मधील हे आकडे समजून घ्या
