Personal Finance: CTC मोठा, पण हातात पगार कमी! Salary Slip मधील हे आकडे समजून घ्या

रोहित गोळे

CTC म्हणजे हातात येणारा पगार नाही! Gross Salary, Net Salary, PF, HRA, TDS, Bonus आणि Employer Contribution यांचा पगारावर कसा परिणाम होतो? Salary Slip मधील प्रत्येक आकडा समजून घ्या आणि प्रत्यक्ष In-hand Salary किती मिळते, हे जाणून घ्या.

ADVERTISEMENT

personal finance ctc vs in hand salary salary slip pf tds gross salary explained
प्रातिनिधिक फोटो
Google CTA

Personal Finance and Salary Slip: CTC म्हणजे तुमच्या हातात येणारा पगार नाही. कंपनी तुमच्यावर वर्षभरात जितका खर्च करते, त्याला CTC म्हणतात. मात्र PF, ग्रॅच्युइटी, इन्शुरन्स, बोनस आणि TDS यांसारख्या घटकांमुळे प्रत्यक्ष बँक खात्यात जमा होणारी रक्कम कमी असते. त्यामुळे Salary Slip मधील प्रत्येक आकडा समजून घेणे महत्त्वाचे आहे.

1. CTC म्हणजे काय?

CTC म्हणजे Cost to Company. एखाद्या कर्मचाऱ्यावर कंपनी वर्षभरात जो एकूण खर्च करते, त्याला CTC म्हणतात.

CTC मध्ये साधारणपणे खालील घटकांचा समावेश असतो: