पतीच्या डोळ्यादेखत वाघाने पत्नीवर केला हल्ला, नवरा बघतच राहिला अन्..

मुंबई तक

• 04:21 PM • 18 Oct 2026

Chandrapur news : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये वाघाच्या हल्ल्यात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. महिला शेतात काम करताना वाघाने तिच्यावर हल्ला केला होता, ज्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Chandrapur news

Chandrapur news

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

उषा शेतातील कामात अगदीच व्यग्र 

point

दबा धरून बसलेल्या वाघाचा हल्ला 

point

घटनेनं परिसरात भीतीचे वातावरण

Chandrapur news : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये वाघाच्या हल्ल्यात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. महिला शेतात काम करताना वाघाने तिच्यावर हल्ला केला होता. घटनास्थळी तिचा नवरा देखील तिथेच होता, त्याने आरडाओरड केली होती. मात्र वाघाने महिलेच्या मानेला पकडले आणि तिला ठार केले. जवळच उपस्थित असलेला महिलेचा पती आपल्या पत्नीला वाघाच्या तावडीतून वाचवू शकला नाही. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, बस-कारच्या अपघातात पाच जणांचा अंत

उषा शेतातील कामात अगदीच व्यग्र 

संबंधित घटनेनं परिसर हादरून गेला आहे. मृत महिलेची उषा अंकुश गुरुनुले अशी ओळख पटली आहे. घडलेल्या घटनेनुसार, उषा या सोयाबीनची कापणीचे काम करत होत्या. तिचे पती अंकुश हे तिच्यासोबत भाताच्या पिकाला पाणी देण्यासाठी जंगलालगतच्या शेतात गेल्या होत्या. त्यांचे पती डिझेल इंजिनजवळ पाण्याची व्यवस्था करत होते, तर उषा शेतातील कामात अगदीच व्यग्र होते. 

दबा धरून बसलेल्या वाघाचा हल्ला 

दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला आणि तिला जंगलात ओढून नेले. इतक्यात पतीने आपल्या बायकोला वाचवण्यासाठी आरडाओरड देखील केली होती. मात्र वाघाने उषाच्या मानेवर हल्ला केला. अशातच तिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे, तसेच महिलेचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठवला होता. 

हे ही वाचा : 'कर्ज फेडलं नाहीतर नखं उपटून मिरचीची पूड टाकेन', धमकीने तरुणाचा मृत्यू

घटनेनं परिसरात भीतीचे वातावरण

केवळ राज्याच नाहीतर देशभरात वाघांचे, बिबट्यांचे सातत्याने हल्ले होऊ लागले आहेत. या घटनेनं परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. अशातच आता जंगलाजवळील शेतात नियमित गस्त घालावी, तसेच संवेदनशील ठिकाणी देखरेख अधिक मजबूत करावी आणि शेतकऱ्यांना वेळेवर सतर्क करण्यासाठी प्रभावी यंत्रणा लागू करावी.