Maharashtra Weather : राज्यात सध्या काही भागांत कोरडं, तर कुठे उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता आहे. काही भागांत पावसाचा यलो अलर्टचा अंदाज वर्तविलेला आहे. तसेच काही भागांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवविलेली आहे, अशातच जाणून घेऊयात 20 ऑक्टोबर 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : नागपूर: विद्यार्थिनीला पाठवले अश्लील मेसेज, सिम्बायोसिस लॉ कॉलेजच्या प्रोफेसरचं लज्जास्पद कृत्य
कोकण
कोकणात पालघर, ठाणे, रायगड, मुंबई येथे हवामान कोरडं राहणार असल्याची शक्यता आहे. रत्नागिरीत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे, तर सिंधुदुर्गात पावसाचा यलो अलर्ट आहे.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाटमाथा आणि अहिल्यानगर येथे हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, पुणे घाटमाथा आणि सोलापूर येथे हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. सांगली, सातारा घाटमाथा आणि सातारा जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. कोल्हापूर आणि कोल्हापूर घाटमाथा परिसरात पावसाचा यलो अलर्टची शक्यता वर्तविली आहे.
मराठवाडा
मराठावाडा विभागात बीड, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर आणि धाराशिव येथे कोरडे हवामान राहील अशी शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर येथे हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
हे ही वाचा : पालघर हादरलं! पोटच्या मुलाने बापाचा गळा चिरून केली हत्या, घटनेनं परिसरात खळबळ
विदर्भ
विदर्भ विभागात अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना हवामान विभागाने कोणताही अलर्ट वर्तविलेला नाही.
ADVERTISEMENT












