मुंबई: इन्स्टाग्रामवर सध्या ८०च्या दशकातील जुन्या फोटोसारखे दिसणारे AI फोटो व्हायरल होत आहेत. साध्या सेल्फीला रेट्रो कपडे, मोठी हेअरस्टाईल, जुन्या काळातील प्रकाशयोजना आणि फिल्मचा टेक्स्चर देऊन हा लूक तयार केला जातो. या ट्रेंडनुसार, नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत सगळेच जण आपला 80 च्या दशकात कसे असू याचा फोटो तयार करून सोशल मीडियावर शेअर करत आहे. पण हा नेमका ट्रेंड काय आहे आणि स्वतःचा फोटो कसा बनवायचा? याबाबत जाणून घेऊया सविस्तरपणे.
ADVERTISEMENT
80s AI Photo Filter Trend म्हणजे काय?
हा ट्रेंड म्हणजे AI च्या मदतीने तुमच्या सध्याच्या फोटोला १९८०च्या दशकातील फोटोचा लूक देणे. यात केवळ जुन्या फोटोसारखा रंग लावला जात नाही, तर कपडे, हेअरस्टाईल, दागिने, बॅकग्राऊंड, प्रकाशयोजना आणि फोटोचा एकूण पोत बदलला जातो. त्यामुळे फोटो एखाद्या जुन्या फॅमिली अल्बममधून, बॉलिवूडच्या फोटोशूटमधून किंवा ८०च्या दशकातील स्टुडिओमधून काढल्यासारखा दिसू शकतो.
हे ही वाचा>> मुंबईची खबर : आरोग्य सेवांसंबंधी बीएमसीचा महत्त्वाचा निर्णय, जाणून घ्या सविस्तर
सोशल मीडियावर एवढा व्हायरल का होतोय?
- नॉस्टॅल्जिया: जुन्या काळातील फॅशन, सिनेमा आणि फोटोग्राफीची आठवण.
- AI ची क्रिएटिव्हिटी: स्वतःचा फोटो पूर्णपणे वेगळ्या काळात कल्पना करता येतो.
- वैयक्तिक लूक: बॉलिवूड पोर्ट्रेट, लग्नाचा अल्बम, डिस्को किंवा जुन्या स्टुडिओसारखे वेगवेगळे पर्याय.
- शेअर करणे सोपे: फोटो तयार झाल्यानंतर तो Instagram Stories, Reels किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करता येतो.
स्वतःचा 80s AI फोटो कसा तयार करायचा?
1. स्पष्ट फोटो निवडा
चेहरा स्पष्ट दिसणारा, चांगल्या प्रकाशातील फोटो वापरा. चेहऱ्यावर जास्त फिल्टर, गॉगल किंवा टोपी नसलेला फोटो निवडल्यास चेहऱ्याचे साम्य टिकवणे सोपे होते.
2. ChatGPT मध्ये फोटो अपलोड करा
नवीन चॅट सुरू करा आणि फोटो अपलोड करा. त्यानंतर तुम्हाला हवा असलेला ८०च्या दशकातील लूक स्पष्टपणे लिहा.
हे ही वाचा>> Govt Jobs : SSC मार्फत अडीच हजार पदांसाठी भरती, 60 हजारांहून अधिक पगार
3. Prompt द्या
कपडे, केस, बॅकग्राऊंड, प्रकाश आणि फोटोचा टेक्स्चर यांचा उल्लेख करा. फक्त “80s filter” असे लिहिण्यापेक्षा सविस्तर सूचना दिल्यास अपेक्षित परिणाम मिळण्याची शक्यता वाढते.
4. फोटो तपासा आणि बदल सांगा
पहिल्या प्रयत्नात लूक योग्य वाटला नाही, तर हेअरस्टाईल, कपडे, बॅकग्राऊंड किंवा प्रकाशयोजना बदलण्यास सांगा. चेहरा आणि ओळख कायम ठेवण्याची सूचना देऊ शकता.
फोटोसाठी हा Prompt वापरा
“Transform this photo into a realistic 1980s Indian retro portrait. Keep my face, facial structure, skin tone, expression and identity recognisable. Restyle my clothing, hairstyle and accessories to match the 1980s. Use authentic period-appropriate styling, warm analogue lighting, subtle film grain, slightly faded colours, soft focus and natural skin texture. Create a believable vintage photograph rather than simply applying an old-photo filter. Remove modern elements such as smartphones, contemporary clothing, modern cars and other present-day objects. Make the final image look like it was genuinely photographed in India in the 1980s.”
ADVERTISEMENT












