Govt Jobs : SSC मार्फत अडीच हजार पदांसाठी भरती, 60 हजारांहून अधिक पगार

मुंबई तक

स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत विविध पदांसाठी भरती सुरु झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 7 ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे. यासाठी पात्रतेचे निकष नेमके काय आहेत, जाणून घ्या सविस्तर.

ADVERTISEMENT

SSC Recruitment
SSC Recruitment
Google CTA

बातम्या हायलाइट

point

Govt Jobs : SSC मार्फत 2 हजारहून अधिक पदांसाठी भरती

point

60 हजारांहून अधिक पगार

SSC Recruitment : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर म्हणजेच CHSL परीक्षा 2026 साठीची अधिकृत भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये व विभागांमध्ये एकूण 2,536 पदांची मोठी भरती केली जाणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले असून, नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे.

शैक्षणिक पात्रता काय?

या भरती प्रक्रियेत मुख्यत्वे डेटा एंट्री ऑपरेटर (DEO), डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड 'A', कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) आणि कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) या पदांचा समावेश आहे. शैक्षणिक पात्रतेसाठी, कनिष्ठ विभाग लिपिक व सचिवालय सहाय्यक पदांकरिता उमेदवार 12 वी उत्तीर्ण असावा, तर डेटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी गणित विषयासह 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय 1 ऑगस्ट 2026 रोजी 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान असावे; यामध्ये एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5 वर्षे तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 3 वर्षे वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

हे ही वाचा : सांगली : केतनराज अ‍ॅकॅडमीत 3 अल्पवयीन मुलींवर अत्याचार, संस्थापकाला अटक

वेतन किती मिळणार?

निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी दिली जाणार आहे. यामध्ये कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) व कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) पदांसाठी पे लेव्हल-2 (रुपये 19,900 ते 63,200) प्रमाणे वेतन मिळेल. तर डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) आणि डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड 'A' या पदांसाठी पे लेव्हल-4 (रुपये 25,500 ते 81,100) व पे लेव्हल-5 (रुपये 29,200 ते 92,300) नुसार वेतन श्रेणी लागू असणार आहे. उमेदवारांची अंतिम पदनिहाय निवड ही त्यांच्या गुणवत्तेवर आणि अर्जात दिलेल्या पसंतीक्रमावर (Merit-cum-Preference) आधारित असेल, तसेच एकदा दिलेले पद नंतर बदलता येणार नाही.

हे ही वाचा : घड्याळ दुरुस्तीच्या दुकानातून चालवल्या जाणाऱ्या पक्षाला अब्जावधींची देणगी

अर्जाची अंतिम मुदत

या भरतीसाठी उमेदवारांना केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्जाची अंतिम तारीख 7 ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे. अर्जात काही चूक झाल्यास दुरुस्तीसाठी 14 ते 16 ऑक्टोबर 2026 या कालावधीत मुदत दिली जाईल. खुल्या व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपये अर्ज शुल्क असून, अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), दिव्यांग (PWD), माजी सैनिक (ExSM) आणि सर्व महिला उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. Tier-I आणि Tier-II परीक्षांच्या तारखा SSC कडून लवकरच जाहीर केल्या जातील.