घड्याळ दुरुस्तीच्या दुकानातून चालवल्या जाणाऱ्या पक्षाला अब्जावधींची देणगी
Political parties donation : निवडणुकांमध्ये फारसे अस्तित्व नसलेल्या छोट्या राजकीय पक्षांना कोट्यवधींच्या देणग्या मिळाल्याची अनेक प्रकरणे आयकर विभागाच्या कारवाईत समोर आली. या देणग्यांच्या माध्यमातून पैसे फिरवणे आणि करसवलतीचा लाभ मिळवून देण्याचा प्रकार कसा होत असल्याचे तपासात समोर आले, जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
एक साधा आमदारही नसलेल्या पक्षांना कोटींची देणगी...
Political parties donation चा कसा होतो गौडबंगाल?
Political parties donation : राजकीय पक्षांना मिळणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या देणग्या आणि त्यांच्या स्रोतांवर सातत्याने प्रश्न उपस्थित होत आले आहेत. निवडणुकांमध्ये फारसे अस्तित्व नसलेल्या काही छोट्या, नोंदणीकृत मात्र मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांना मोठ्या पक्षांपेक्षाही अधिक देणग्या कशा मिळतात, हा प्रश्न यामुळे चर्चेत आला आहे. या देणग्यांच्या माध्यमातून पैशांची उलाढाल कशी केली जाते आणि आयकर विभागाच्या कारवाईत या आर्थिक व्यवहारांचा कसा पर्दाफाश झाला, याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत.
हेही वाचा : हवालदार करायचा बायकोचा छळ, शेवटी डोक्यात रॉड घालून हत्या; नेमकं कारण काय?
घड्याळ दुरुस्तीच्या दुकानातून चालवल्या जाणाऱ्या पक्षाला 370 कोटींच्या देणग्या
2022 मध्ये आयकर विभागाने देशभरातील सुमारे 205 ठिकाणी छापेमारी केली होती. मुंबईपासून उत्तर प्रदेश, दिल्ली एनसीआर, राजस्थान आणि गुजरातपर्यंत अशा छोट्या राजकीय पक्षांवर कारवाई करण्यात आली होती. उत्तर प्रदेशातील सुलतानपूरमध्ये आयकर अधिकाऱ्यांना घड्याळ दुरुस्तीच्या दुकानातून चालवला जाणारा एक राजकीय पक्ष आढळला. या पक्षाला 2019 ते 2022 या तीन वर्षांत तब्बल 370 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या. मात्र पक्षाचा अध्यक्ष असलेल्या घड्याळ दुरुस्ती दुकानदाराला या देणग्या कोणी दिल्या, याची माहिती नव्हती. गुजरातमधील अहमदाबाद येथील पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला याबाबत माहिती असण्याची शक्यता त्याने व्यक्त केली. त्यानंतर चौकशीत प्रदेशाध्यक्षाने तीन टक्के कमिशनच्या मोबदल्यात देणगीचे प्रमाणपत्र दिल्याची कबुली दिली. उर्वरित रक्कम विविध संस्थांच्या माध्यमातून फिरवण्यात आली आणि त्यानंतर देणगी देणाऱ्या व्यक्ती व संस्थांना रोख स्वरूपात परत करण्यात आल्याचे समोर आले.
हेही वाचा : सुनेनं केला उद्योगपती सासऱ्याचा गेम, खतरनाक प्लॅन बनवूनही सापडली, काय घडलं?
