हवालदार करायचा बायकोचा छळ, शेवटी डोक्यात रॉड घालून हत्या; नेमकं कारण काय?
एका हेड कॉन्स्टेबलने बायकोच्या डोक्यात रॉड घालून तिची हत्या केली. कौटुंबिक कलहातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. लखनऊमधील ही घटना आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
हवालदार करायचा बायकोचा छळ
शेवटी डोक्यात रॉड घालून हत्या
नेमकं कारण काय?
Crime News : एका हेड कॉन्स्टेबलने कौटुंबिक वादातून आपल्या पत्नीची लोखंडी रॉडने डोक्यावर वार करून निर्घृण हत्या केली. हिमांशू असे या आरोपी पोलिसाचे नाव असून घटनेनंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. मूळचा अयोध्या येथील रहिवासी असलेला हिमांशू लखनऊमधील माहिती अधिकार (RTI) सेल कार्यालयात कार्यरत होता आणि तो आपल्या कुटुंबासह लखनऊमध्ये सुमारे अडीच वर्षांपासून एका भाड्याच्या घरात राहत होता.
डोक्यात रॉड घालून हत्या
रविवारी हिमांशू आणि त्याची 40 वर्षीय पत्नी रश्मी यांच्यात कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हिंसक हाणामारीत झाले आणि त्यातच हिमांशूने रश्मीच्या डोक्यावर लोखंडी रॉडने जोरदार प्रहार केला, ज्यामुळे अतिरक्तस्राव होऊन तिचा मृत्यू झाला. हत्येनंतर हिमांशू काही काळ घरमालकासोबत बसला आणि नंतर आपल्या एक वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन सुमारे तीन तास बाहेर फिरत राहिला. त्यानंतर तो पुन्हा घरी परतला आणि पत्नीच्या मृतदेहाजवळ शांतपणे बसून राहिला.
हे ही वाचा : MPSCच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी, विद्यार्थ्यांनी लिहिलेले पोस्टर, VIDEO पाहाच
भावाने फोन केला, पण...
रश्मीने वारंवार फोन करूनही उचलला नाही, त्यामुळे तिचा भाऊ सौरभ याला काळजी वाटू लागली आणि तो इतर कुटुंबीयांसह तिच्या घरी पोहोचला. तिथे त्यांना रश्मी स्वयंपाकघराजवळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली आणि तिचा आधीच मृत्यू झाला होता. यावेळी हिमांशू घरातच उपस्थित होता, मात्र नातेवाइकांनी विचारपूस केल्यावर त्याने कोणतीही स्पष्ट उत्तरे दिली नाहीत. अखेर कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून आरोपीला ताब्यात घेतले.
हे ही वाचा : अभिनेत्री प्रीती झिंटाच्या टी-शर्टवर IAS तुकाराम मुंढेंचं नाव, फोटो प्रचंड व्हायरल
पोलीस असल्यामुळे सुटला
रश्मीच्या भावाने आरोप केला आहे की, 2015 मध्ये लग्न झाल्यापासून हिमांशू तिचा सतत छळ करत होता, परंतु पोलीस खात्यात असल्यामुळे तो नेहमीच कारवाईतून वाचत आला. यापूर्वीही त्याने टॉवेलने गळा दाबून रश्मीला मारण्याचा प्रयत्न केला होता, तरीही आपला संसार वाचवण्यासाठी ती हा सर्व त्रास मुकाट्याने सहन करत होती. रश्मीच्या वडिलांनी सांगितले की, जन्माष्टमीच्या दिवशीच तिने 'सर्व काही ठीक आहे' असा मेसेज पाठवला होता, त्यामुळे अशी भयंकर घटना घडेल याची कुटुंबाला पुसटशीही कल्पना नव्हती.
