अभिनेत्री प्रीती झिंटाच्या टी-शर्टवर IAS तुकाराम मुंढेंचं नाव, फोटो प्रचंड व्हायरल

मुंबई तक

अभिनेत्री प्रीती झिंटा हिचा मुंबईतील वांद्रे परिसरातील एक फोटो चर्चेत आला आहे. ‘टीम तुकाराम मुंढे’ असा संदेश असलेल्या टी-शर्टमुळे तिचा लूक व्हायरल झाला असून, IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कामाला तिने पाठिंबा दिल्याचे दिसत आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
प्रीती झिंटाचा IAS तुकाराम मुंढेंना पाठिंबा
Google CTA

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात तिचा एक लूक समोर आला असून, तिने घातलेल्या टी-शर्टवरील संदेशाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या टी-शर्टवर ‘टीम तुकाराम मुंढे’ असे लिहिलेले दिसत आहे. 
टी-शर्टवरून व्यक्त केला पाठिंबा

प्रीती झिंटा हिने काळ्या रंगाची टी-शर्ट घातली होती. त्यावर ‘टीम तुकाराम मुंढे’ असा संदेश होता. या माध्यमातून तिने महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त आणि IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कामाला पाठिंबा दर्शवल्याचे दिसते. 

तुकाराम मुंढे हे मुंबईतील अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन, अस्वच्छता आणि भेसळ यांविरोधात कारवाईसाठी चर्चेत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासनाने खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेशी संबंधित बाबींवर लक्ष केंद्रित केले आहे.

साध्या लूकमध्ये दिसली अभिनेत्री