धावत्या कारवर कोसळलं झाड, उपजिल्हाधिकाऱ्याच्या आईचा दुर्दैवी मृत्यू
इंदूरमध्ये मुसळधार पावसादरम्यान एमजी रोड परिसरात चालत्या कारवर इमलीचं झाड कोसळलं. उपजिल्हाधिकारी पूर्णिमा सिंघी यांच्या 72 वर्षीय आई राधा देवी यांचा मृत्यू झाला. चालकासह तीन जण जखमी झाले.
ADVERTISEMENT

स्क्रीनग्रॅब
इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये मुसळधार पावसादरम्यान एक हृदयद्रावक अपघात घडला. एमजी रोड परिसरात भरधाव कारवर अचानक चिंचेचं झाड कोसळलं. या कारमध्ये चार जण प्रवास करत होते. झाड कोसळल्याने कारमधील सर्वजण आत अडकले. या दुर्घटनेत 72 वर्षीय राधा देवी यांचा मृत्यू झाला, तर कारच्या चालकासह तीन जण जखमी झाले. राधा देवी या एनव्हीडीएमध्ये कार्यरत डिप्टी कलेक्टर पूर्णिमा सिंघी यांच्या आई होत्या.
डोळ्यांवर उपचार करून घरी परतत होत्या
मिळालेल्या माहितीनुसार, राधा देवी डोळ्यांवर उपचार करून इतरांसोबत कारमधून घरी परतत होत्या. त्याचवेळी इंदूरमध्ये जोरदार पाऊस सुरू होता. एमजी रोड परिसरातून कार जात असताना अचानक चिंचेचं झाड कारवर कोसळलं. या दुर्घटनेनंतर कार पूर्णपणे झाडाखाली दबली आणि त्यातील प्रवासी आत अडकले.
कारमध्ये चार जण, तिघे जखमी
