ही दृश्ये तुम्हाला विचलित करू शकतात...

मुंबई तक

dahihandi sohala maharashtra obscene dance : महाराष्ट्रातील दहिहंडी सोहळ्यात आयोजित करण्यात आलेल्या काही मनोरंजनाच्या कार्यक्रमांतील अश्लिल नृत्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एकीकडे सण सांस्कृतिक पद्धतीने साजरे करण्याचे आवाहन होत असताना या कार्यक्रमांवर सोशल मीडियावर टीका होत आहे.

ADVERTISEMENT

dahihandi sohala maharashtra obscene dance
dahihandi sohala maharashtra obscene dance
Google CTA

बातम्या हायलाइट

point

ही दृश्ये तुम्हाला विचलित करू शकतात...

dahihandi sohala maharashtra obscene dance : दहिहंडीचा कार्यक्रम महाराष्ट्रात ठिकठिकाणी आयोजित करण्यात आला होता. यावेळी अनेक राजकीय नेत्यांकडून मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमांमध्ये अश्लिल नृत्यांचे प्रकार झाल्याचे समोर आले आहे. या नृत्यांचे आणि संबंधित कार्यक्रमांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यावर जोरदार चर्चा सुरू आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओंमधून या कार्यक्रमांमध्ये नेमक्या कोणत्या प्रकारचे नृत्य सादर करण्यात आले, हा प्रश्न उपस्थित केला जातोय. नेटकऱ्यांकडून या अश्लील नृत्यांच्या कार्यक्रमांवर टीका होताना पाहायला मिळतीये. 

हेही वाचा : अभिनेत्री प्रीती झिंटाच्या टी-शर्टवर IAS तुकाराम मुंढेंचं नाव, फोटो प्रचंड व्हायरल

एकीकडे गणेशोत्सवात डीजे नको, अशी भूमिका घेत जागृक नागरिक विद्यानंद बापट मैदानात उतरले आहेत. त्यांनी डीजेच्या विरोधात भूमिका घेतली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सण सांस्कृतिक पद्धतीने साजरे केले पाहिजेत, असे मत मांडले आहे. त्यामुळे सण-उत्सव कशा पद्धतीने साजरे केले जावेत, यावर चर्चा सुरू असतानाच नुकत्याच पार पडलेल्या दहिहंडी उत्सवातील काही कार्यक्रमांचे व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.

हेही वाचा : MPSCच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी, विद्यार्थ्यांनी लिहिलेले पोस्टर, VIDEO पाहाच