मुंबईची खबर : आरोग्य सेवांसंबंधी बीएमसीचा महत्त्वाचा निर्णय, जाणून घ्या सविस्तर

मुंबई तक

मुंबई महापालिकेने आपल्या आरोग्य सेवांमध्ये डिजिटल क्रांती घडवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ही योजना नेमकी काय आहे, जाणून घ्या सविस्तर.

ADVERTISEMENT

Mumbai News
Mumbai News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

आरोग्य सेवांसंबंधी बीएमसीचा महत्त्वाचा निर्णय

point

जाणून घ्या सविस्तर

Mumbai News : मुंबई महापालिकेने आपल्या आरोग्य सेवांमध्ये डिजिटल क्रांती घडवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जन्म-मृत्यू दाखल्यांपासून ते रुग्णालयांच्या नोंदी, शुल्क भरणा आणि तक्रार निवारणापर्यंतच्या सर्व सेवा आता ऑनलाइन करण्याचा निर्णय पालिकेने हाती घेतले आहे. रुग्णांना जलद, पारदर्शक आणि सुलभ सेवा मिळाव्यात हा यामागचा मुख्य उद्देश आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवांगारे यांनी मंगळवारी (8 सप्टेंबर) पालिकेची सर्व रुग्णालये लवकरच पूर्णपणे डिजिटल करण्याची योजना असल्याची माहिती दिली.

हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम

या उपक्रमांतर्गत लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालयात (सायन रुग्णालय) सुरू असलेल्या 'हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम' (HMIS) या प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्पाची पाहणी अतिरिक्त आयुक्तांनी केली. सायन रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात (OPD) दररोज सुमारे 15 हजार रुग्ण उपचारासाठी येतात. येथे लागू करण्यात आलेल्या डिजिटल नोंदणी प्रणालीमुळे रुग्णांना केसपेपरसाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागणार नाही आणि त्यांच्या वेळेची मोठी बचत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हे ही वाचा : बाप - लेकीच्या नात्याला काळिमा, अल्पवयीन लेकीवर बापाकडून लैंगिक अत्याचार, जन्मठेपेची शिक्षा

ऑनलाईन शुल्काचा पर्याय मिळणार

प्रशासनाने डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी रुग्णालयात आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. बाह्यरुग्ण नोंदणी शुल्क आता क्यूआर कोडद्वारे मोबाईल UPI वापरून सहजरीत्या भरता येणार आहे. याशिवाय डिजिटल पेमेंट अधिक सोपे व्हावे यासाठी सायन रुग्णालयात 10 पीओएस (POS) मशिन्स देखील बसवण्यात आल्या आहेत. आगामी टप्प्यांमध्ये रुग्णांचा वैद्यकीय इतिहास, लॅब रिपोर्ट आणि सोनोोग्राफी, एमआरआय, सीटी स्कॅन यांसारख्या विविध तपासण्यांचे अहवाल पूर्णपणे डिजिटल केले जातील आणि त्यातही ऑनलाइन शुल्काचा पर्याय समाविष्ट केला जाईल.

हे ही वाचा : चलाख सूनेनेच रडून फसवलं! चाकूचे 26 वार, सासऱ्याची निघृण हत्या

AI आधारित तंत्रज्ञानाचा वापर

डॉक्टरांचा वेळ वाचवण्यासाठी आणि प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान करण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात AI आधारित 'टेक्स्ट-टू-स्पीच' तंत्रज्ञानाचा वापर प्रस्तावित करण्यात आला आहे. यामुळे डॉक्टरांनी बोललेले शब्द थेट डिजिटल वैद्यकीय नोंदींमध्ये रूपांतरित होतील, ज्यामुळे डॉक्टरांना कागदोपत्री नोंदणीसाठी लागणारा वेळ वाचेल. पालिकेच्या सर्व प्रसुती गृह आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (HBT) क्लिनिकमध्ये ही प्रणाली आधीपासूनच कार्यरत असून, येत्या एप्रिल महिन्यापर्यंत मुंबईतील पालिकेची सर्व रुग्णालये 'HMIS' प्रणालीने जोडण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे.