Maharashtra Weather : राज्यात पाऊस झाला गायब? IMD चा अलर्ट

मुंबई तक

• 05:00 AM • 10 Sep 2026

Maharashtra Weather : 2026 मध्ये मान्सूनची तीव्रता ही कमी जाणवत आहे. कुठे हलका तर कुठे मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशातच जाणून घेऊयात 10 सप्टेंबर 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज. 

Maharashtra Weather

Maharashtra Weather

Google CTA

बातम्या हायलाइट

point

​​​​​​​गणेशोत्सवाच्या तोंडावर नेमका पाऊस कुठे गायब झालाय?

point

10 सप्टेंबर 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather : गणेशोत्सवाच्या तोंडावर नेमका पाऊस कुठे गायब झालाय? असा अनेकांना प्रश्न सतावत आहे. गणेशोत्सवात पावसाची दमदार हजेरी असते, मात्र यंदा म्हणजेच 2026 मध्ये मान्सूनची तीव्रता ही कमी जाणवत आहे. कुठे हलका तर कुठे मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशातच जाणून घेऊयात 10 सप्टेंबर 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : राजकीय नेत्यांना AI च्या फोटोची भुरळ, 80sचा ट्रेंड केलाय फॉलो

कोकण 

कोकणात पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीये. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रात धुळे, जळगाव, नाशिक येथे हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. तर अहिल्यानगर येथे हवामान कोरडं राहण्याची अधिक शक्यता आहे. नाशिक घाटमाथा आणि नंदुरबार या ठिराणी विजांसह हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, कोल्हापूर घाटमाथा, सातारा येथे हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात येतोय. पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा येथे विजांसह हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली आणि सोलापूरात हवामान कोरडं राहण्याची अधिक शक्यता आहे.

मराठवाडा 

मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि धाराशिव येथे हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. लातूर, हिंगोली येथे हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. 

हे ही वाचा : मुंढवा जमीन घोटाळा, पार्थ पवारांच्या अडचणीत वाढ? हायकोर्टानं काय सांगितलं?

विदर्भ 

विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना हवामान विभागाने कोणताही अलर्ट जारी केला नाही.