Maharashtra Weather : राज्यात सध्या संथपणे पावसाच्या धारा कोसळत आहेत. काही ठिकाणी हलका ते मध्यम तर कुठे मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर काही भागांत हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. अशातच जाणून घ्या 9 सप्टेंबर 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : शिवेंद्रसिंह राजे यांचा 'तो' फोटो व्हायरल, सोशल मीडियावर पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया
कोकण
कोकणात पालघर, मुंबई आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे. ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात येते.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार येथे विजांसह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. जळगाव, नाशिक, अहिल्यानगर येथे हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. नाशिक घाटमाथा परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज राहण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर घाटमाथा येथे हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. सोलापूरमध्ये कोरडं हवामान राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे, तर पुणे घाटमाथा आणि सातारा घाटमाथा परिसरात विजांसह मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.
मराठवाडा
मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
हे ही वाचा : घड्याळ दुरुस्तीच्या दुकानातून चालवल्या जाणाऱ्या पक्षाला अब्जावधींची देणगी
विदर्भ
विदर्भात अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांत हवामान विभागाने कोणताही अंदाज वर्तविलेला नाही.
ADVERTISEMENT












