MPSC Protest Pune : पेपरफुटीच्या तपासात काय सापडलं? पुण्यातील मोर्चाची स्टोरी

मुंबई तक

09 Sep 2026 (अपडेटेड: 09 Sep 2026, 09:30 AM)

mpsc protest pune paper leak investigation : MPSC विद्यार्थ्यांच्या पुण्यातील आक्रोश मोर्चात परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि पेपरफुटीच्या तपासाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. ड्रग इन्स्पेक्टर पेपरफुटी प्रकरणातील 77 प्रश्न, आर्थिक व्यवहार आणि तपासातील धागेदोऱ्यांवर विद्यार्थ्यांनी आवाज उठवला.

mpsc protest pune paper leak investigation

mpsc protest pune paper leak investigation

Google CTA

बातम्या हायलाइट

point

MPSC Protest Pune : पेपरफुटीच्या तपासात काय सापडलं?

point

पुण्यातील मोर्चाची स्टोरी

mpsc protest pune paper leak investigation : पुण्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विद्यार्थ्यांनी पेपरफुटी प्रकरण आणि परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या मागणीसाठी आक्रोश मोर्चा काढला. आयोगाच्या अध्यक्ष आणि सचिवांनी राजीनामा द्यावा, अशी प्रमुख मागणी विद्यार्थ्यांनी केली. याशिवाय गट ब परीक्षेतील आक्षेपांवर आठ दिवसांत स्पष्टीकरण द्यावे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 आणि कृषी सेवा परीक्षेतील वर्णनात्मक पेपर तपासणीतील चुकांची चौकशी करावी. तसेच मुंबई क्राईम ब्रँचकडून आयोगाला देण्यात आलेला प्राथमिक चौकशी अहवाल सार्वजनिक करावा, अशा मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या. अटकेत असलेले आरोपी आणि अवर सचिव अभिजीत लेंडवे यांच्या कार्यकाळातील सर्व परीक्षांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याची मागणीही करण्यात आली.

हे वाचलं का?

हेही वाचा : फ्लाईंग किस, अश्लील हावभाव, दहीहंडीचा उत्सव या थराला का गेला? अविनाश जाधव EXCLUSIVE

वाशीच्या खाडीत लॅपटॉप फेकल्याचा संशय, आता तज्ज्ञांकडून रिकव्हरी सुरु 

अन्न आणि औषध प्रशासनाच्या ड्रग इन्स्पेक्टर परीक्षेतील पेपरफुटीच्या तपासात काही महत्त्वाचे धागेदोरे समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. MPSC अधिकारी नखाते यांनी वाशीच्या खाडीत लॅपटॉप फेकल्याचा संशय होता. हा लॅपटॉप क्राईम ब्रँचने हस्तगत केला असून, त्यातील डेटा मिळवण्यासाठी सायबर फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. आतापर्यंत मिळालेल्या प्रश्नांच्या यादीपैकी 294 पैकी 77 प्रश्न प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेत आले असून, त्यांचे पर्यायही हुबेहूब जुळल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिका फुटल्याचे तपासात स्पष्ट होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

हेही वाचा : फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी मराठ्यांचा बळी घेतला, आपण बदला नक्की घेऊ; जरांगेंचं थेट आव्हान

आर्थिक व्यवहारांशी संबंधित दोन डायऱ्या सापडल्या?

पोलीस तपासात प्रवीण पाटील आणि ऋतुजा पाटीलचे वडील अमृत पाटील यांच्यात 12 लाख रुपयांचा व्यवहार ठरल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यापैकी 10 लाख रुपये MPSC मधील अधिकाऱ्यांना देण्यात येणार असल्याचे तपासात समोर आल्याचे सांगण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यातील पाच लाख रुपये MPSC कार्यालयाच्या पार्किंग परिसरात एका अधिकाऱ्यापर्यंत देण्यात आल्याचा दावा आहे. या व्यवहाराची पुष्टी करण्यासाठी CCTV फुटेज, मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स आणि आर्थिक व्यवहारांची माहिती तपासली जात आहे. नंदुरबारमधील कौटिल्य अकॅडमीच्या झडतीदरम्यान आर्थिक व्यवहारांशी संबंधित दोन डायऱ्या सापडल्याचेही सांगण्यात आले असून, त्यातील नावे, रकमा आणि तारखांची पडताळणी सुरू आहे.

या प्रकरणात गोपाळ मराठे यांचे नावही समोर आले असून, त्यांचा कौटिल्य अकॅडमीशी संबंध असल्याचे सांगण्यात आले आहे. 2017 पासून आयोगाने घेतलेल्या परीक्षांमध्ये अशाच प्रकारचे व्यवहार झाले का, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे. विद्यार्थ्यांचा रोष केवळ एका परीक्षेच्या पेपरफुटीपुरता मर्यादित नसून, परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता आणि आयोगाच्या उत्तरदायित्वाबाबत असल्याचे आंदोलनातून दिसून आले. पाच हजारांहून अधिक विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाल्याचा दावा करण्यात आला. पुण्यातील कनिष्ठ अभियंता भरतीसह MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या इतर परीक्षांबाबतही विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केले. सरकारने परीक्षा पारदर्शक करण्यासाठी विशेष समिती नेमण्याचे सांगितले असले तरी, विद्यार्थ्यांना आयोगाकडून पारदर्शकता आणि उत्तरदायित्व अपेक्षित आहे.