मुंढवा जमीन घोटाळा, पार्थ पवारांच्या अडचणीत वाढ? हायकोर्टानं काय सांगितलं?
Parth Pawar Mundhwa Land Scam : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यसभेचे खासदार पार्थ पवार यांच्यावर अमेडिया जमीन घोटाळा प्रकरणात अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. या प्रकरणात त्यांना आरोपी करण्याची मागणी सूर्यकांत गुलाबराव यांनी केली होती. त्यांच्याच याचिकेच्या मागणीवर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आल्याचे निर्देश आता मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना दिले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अमेडिया जमीन घोटाळा प्रकरणात न्यायालयाच्या आदेशात काय?
न्यायमू्र्ती माधव जमादार यांच्या खंडपीठाने केलेले निरीक्षण
Parth Pawar Mundhwa Land Scam : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यसभेचे खासदार पार्थ पवार यांच्यावर अमेडिया जमीन घोटाळा प्रकरणात अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. या प्रकरणात त्यांना आरोपी करण्याची मागणी सूर्यकांत गुलाबराव यांनी केली होती. त्यांच्याच याचिकेच्या मागणीवर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आल्याचे निर्देश आता मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना दिले आहेत.
हे ही वाचा : नेते ते अभिनेते.. AI च्या 'या' ट्रेंडने लावलंय सर्वांनाच वेड, कसे बनवाल 80s च्या हिरो-हिरोईनसारखे फोटो?
न्यायालयाच्या आदेशात काय?
'मेसर्स अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी' या कंपनीच्या जमीन घोटाळा प्रकरणात दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार हे दोन संचालक आहेत. अशातच दिग्विजय पाटील यांना या प्रकरणात आरोपी करण्यात आले असले तरीही, पार्थ पवार यांना अद्यापही आरोपी करण्यात आले नाही, कारण ते प्रभावशाली असून राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आहेत', असे न्यायालयाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
न्यायमू्र्ती माधव जमादार यांच्या खंडपीठाने केलेले निरीक्षण
दरम्यान, न्यायमू्र्ती माधव जमादार यांच्या खंडपीठाने सोमवारी या प्रकरणाची दखल घेतली होती, अमेडिया जमीन घोटाळा प्रकरणाशी संबंधित असलेल्या 40 एकर जमिनीच्या प्रकरणात कंपनीचे विजय पाटील आणि पार्थ पवार हे दोन संचालक आहेत, असे खंडपीठाने निरीक्षण केले. पार्थ पवार हे माजी दिवंगत उपमुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे चिरंजीव आहेत.
पुण्यातील बडतर्फ करण्यात आलेले तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर या खंडपीठाने सुनावणी केली होती, पुण्याच्या खडक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या या प्रकरणात दिलासा मिळवण्यासाठी येवले यांनी हा अर्ज केला होता, त्यांची बाजू वकील हर्षद व्ही. निंबाळकर, सत्यम निंबाळकर आणि अभिषेक आरोटे यांनी मांडली. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी ही 28 सप्टेंबर रोजी होणार आहे. येवले यांना दिलासा देत, खंडपीठाने निर्देश दिले असले तरीही त्यांच्याविरुद्ध कोणतीही कठोर कारवाई केली जाऊ नये, असे सांगितले.