Lalbaugcha Raja 2026: आता अवघ्या काही तासात लालबागच्या राजाची पहिली झलक; किती वाजता होणार प्रथम दर्शन?

मुंबई तक

• 02:37 PM • 11 Sep 2026

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा यंदाचा गणेशोत्सव 93व्या वर्षात प्रवेश करत आहे. 14 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवापूर्वी आज 11 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता लालबाग मार्केटमध्ये ‘लालबागचा राजा 2026’चे प्रथम दर्शन घडणार आहे.

lalbaugcha raja 2026 first darshan photo session timing mumbai ganeshotsa

Lalbaugcha Raja (फाइल फोटो)

Google CTA

Lalbaugcha Raja First Darshan: मुंबई: मुंबईतील लाखो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा यंदाचा गणेशोत्सव 93व्या वर्षात प्रवेश करत आहे. यंदाचा भाद्रपद गणेशोत्सव सोमवार, 14 सप्टेंबर ते शुक्रवार, 25 सप्टेंबर 2026 या कालावधीत मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे.

हे वाचलं का?

गणेशोत्सवाला सुरुवात होण्यापूर्वीच लालबागच्या राजाचे प्रथम दर्शन घडणार आहे. शुक्रवार, 11 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी ठीक 7 वाजता लालबाग मार्केटमध्ये ‘लालबागचा राजा 2026’चे प्रथम दर्शन घडविण्यात येणार आहे. यावेळी सर्व मीडिया प्रतिनिधींसाठी लालबागच्या राजाचे फोटोसेशन आयोजित करण्यात आले आहे.

14 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात

यंदाचा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा भाद्रपद गणेशोत्सव 14 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2026 या कालावधीत साजरा होणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या प्रथम दर्शनाकडे गणेशभक्तांसोबतच मीडिया प्रतिनिधींचेही लक्ष लागले आहे.

मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे आणि मानद सचिव सुधीर सीताराम साळवी यांनी मीडिया प्रतिनिधींना नियोजनानुसार फोटोसेशन करण्याचे तसेच आवश्यक सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

मीडिया प्रतिनिधींसाठी विशेष व्यवस्था

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने फोटोसेशनसाठी येणाऱ्या मीडिया प्रतिनिधींसाठी नियोजन केले आहे. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणावरूनच सर्व मीडिया प्रतिनिधींनी फोटोशूट करावे, अशी विनंती करण्यात आली आहे. फोटोसेशनदरम्यान मंडळाचे कार्यकर्ते मीडिया प्रतिनिधींना आवश्यक ते सहकार्य करणार आहेत.

प्रेस आयडी असणे बंधनकारक

लालबागच्या राजाच्या प्रथम दर्शनाचे न्यूज कव्हरेज करण्यासाठी येणाऱ्या सर्व मीडिया प्रतिनिधींनी आपल्या न्यूज पेपर किंवा न्यूज चॅनलचे प्रेस आयडी सोबत ठेवणे आवश्यक आहे. प्रेस आयडी असलेल्या प्रतिनिधींनाच मीडिया स्टेजवर प्रवेश दिला जाणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.