वसई-विरारमध्ये आगमनादरम्यान ट्रॉली उलटली, दुर्घटनेत बाप्पांची मूर्ती कोसळली

मुंबई तक

• 04:27 PM • 13 Sep 2026

Vasai Ganeshmurthy accident : वसईतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यशवंत गौरवर येथे गणरायाच्या आगमन समारंभाला गालबोट लागलं. गणेश मूर्तीचे आगमन करताना ट्रॉली अचानकपणे पलटली आणि या अपघातात बाप्पाची मूर्ती खाली कोसळली.

Vasai Ganeshmurthy Accident

Vasai Ganeshmurthy Accident

Google CTA

बातम्या हायलाइट

point

वसईतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस

point

गणरायाच्या आगमन समारंभाला गालबोट

Vasai Ganeshmurthy accident : वसईतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यशवंत गौरवर येथे गणरायाच्या आगमन समारंभाला गालबोट लागलं. गणेश मूर्तीचे आगमन करताना ट्रॉली अचानकपणे पलटली आणि या अपघातात बाप्पाची मूर्ती खाली कोसळली. यापूर्वी देखील मुंबईतील भुलेश्वरची मूर्ती कोसळली होती. यानंतर ही दुर्घटना घडली आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : महिलेचा दीरावर जडला जीव, दुधात गुंगीचे औषध मिसळून नवऱ्याला संपवलं

गणेश मंडळाचे कार्यकर्ते हे मूर्तीकाराकडून मुर्ती आणण्यासाठी गेले होते, त्यानंतर मूर्ती आणली असता ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेदरम्यान कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याची माहिती आहे. घटनास्थळी असलेल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिस्थितीत हाताळली. दरम्यान, यंदाच्या गणेशोत्सवात अशा घटना सतत घडताना दिसून येत आहे. यामुळे गणेश मंडळांमध्ये कुठेतरी आक्रोश दिसून येत आहे. 

नेमकं काय घडलं? 

मुसळधार पाऊस सुरू असताना ही दुर्दैवी घटना घडल्याचे वृत्त आहे. रस्ता देखील अगदीच खराब असल्याने ही घटना घडली. यामुळे अनेक कार्यकर्त्यांना मूर्ती आपल्या मंडपापर्यंत घेऊन जाण्यास अडथळा निर्माण झाला होता. स्थानिक प्रशानाच्या या दुरावस्थेमुळे रस्त्यात साठलेले पाण्यामुळे या घटनेला सामोरे जावे लागत आहे. 

हे ही वाचा : शिक्षकाने विद्यार्थीनीला वासनेचा बळी बनवून केलं गर्भवती, पीडितेनं उचललं टोकाचं पाऊल

भुलेश्वरचा राजा आगमन मिरवणुकीदरम्यान 22 फुटांची मोठी गणेशमूर्ती कोसळली

दरम्यान, यापूर्वी मुंबईतील 'भुलेश्वरचा राजा' गणेशोत्सव मंडळाच्या आगमन मिरवणुकीदरम्यान 22 फुटांची मोठी गणेशमूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला. यासाठी लालबागच्या राजा मंडळाने भुलेश्वर मंडळाला 11 लाख रुपयांची आर्थिक मदत केली. तर मृत व्यक्तीच्या कुटुंबीयाला देखील 5 लाखांची मदत केली होती.