Govt Jobs : महिन्याला 1 लाख रुपयांहून अधिक पगार हवाय? 'या' बँकेत नोकरीची संधी, लगेच करा अर्ज

पृथ्वीराज पाटील

• 04:05 PM • 22 Nov 2026

भारतीय लघुविकास बँकेत विविध पदांसाठी भरती सुरु झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 डिसेंबर आहे.

SIDBI Recruitment 2026

SIDBI Recruitment 2026

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

भारतीय लघुविकास बँकेत भरती

point

काय आहेत पात्रतेचे निकष?

point

एक लाख रुपयांहून अधिक पगार

SIDBI Recruitment 2026 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (SIDBI) अर्थात भारतीय लघुउद्योग विकास बँकेने असिस्टंट मॅनेजर ग्रेड A आणि मॅनेजर ग्रेड B या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 68 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यापैकी ग्रेड A पदासाठी 63, तर ग्रेड B पदासाठी 5 जागा आहेत. 

हे वाचलं का?

पात्रतेचे निकष काय?

या भरतीमध्ये जनरल, हिंदी, लीगल आणि सिस्टिम्स/आयटीशी संबंधित विविध पदांचा समावेश आहे. पदानुसार उमेदवारांची शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. यासाठी पदवी, व्यावसायिक अभ्यासक्रम, एमबीए किंवा पीजीडीएम, कायद्याची पदवी, इंजिनिअरिंग किंवा एमसीए यांसारख्या शैक्षणिक पात्रता आवश्यक आहेत. वयोमर्यादेबाबत बोलायचे झाल्यास, ग्रेड A पदासाठी उमेदवारांचे वय 21 ते 30 वर्षे, तर ग्रेड B पदासाठी 25 ते 33 वर्षे असणे आवश्यक आहे. काही पदांसाठी कामाचा अनुभव आवश्यक असून, ग्रेड A जनरल प्रवर्गातील काही उमेदवारांना अनुभवाच्या अटीतून सूट देण्यात आली आहे.

हे ही वाचा : मुंबईची खबर : मुंबईकरांची ट्राफिकमधून सुटका होणार! काय आहे 'पाताळ लोक' प्रकल्प?

अर्जाची अंतिम मुदत

या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज प्रक्रिया 21 नोव्हेंबर 2026 पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 डिसेंबर 2026 आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे. उमेदवारांची निवड तीन टप्प्यांत केली जाणार आहे. यामध्ये पहिली परीक्षा (Phase I), दुसरी परीक्षा (Phase II) आणि मुलाखत (Interview) यांचा समावेश आहे. भरतीसाठीची संभाव्य परीक्षा 27 डिसेंबर 2026 रोजी होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : रेल्वेत सापडला महिलेचा कुजलेला मृतदेह, भिकाऱ्याने बलात्कार करुन केली होती हत्या

पगार किती मिळणार?

ग्रेड A पदांसाठी 62,500 ते 1,26,100 रुपये आणि  ग्गेड B पदांसाठी 78,450 ते 1,41,600 रुपये इतके वेतन दिले जाणार आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पदनिहाय शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभवाची अट आणि निवड प्रक्रियेची सविस्तर माहिती अधिकृत जाहिरातीतून तपासून घ्यावी. इच्छुक उमेदवार SIDBI च्या अधिकृत वेबसाइट www.sidbi.in वर जाऊन भरतीसंदर्भातील माहिती मिळवू शकतात आणि ऑनलाइन अर्ज करू शकतात.