कोकण रेल्वेच्या वाहतुकीचे वेळापत्रक विस्कळीत, कोकणकन्यासह 'या' गाड्यांना सात तासांचा विलंब

सुशांत काळे

• 02:10 PM • 22 Nov 2026

Konkan Kanya Express Delay : इंजिनमधील तांत्रिक बिघाडामुळे कोकण रेल्वेवरील वाहतुकीचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसला तब्बल सात तासांचा विलंब झाला असून, याचा थेट परिणाम कोकणकन्या आणि तेजस एक्स्प्रेससह इतर अनेक गाड्यांवर झाला आहे.

Konkan Kanya Express Delay

Konkan Kanya Express Delay

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

साडेसहा ते सात तासांच्या विलंबाने प्रवाशांना मोठा मनस्ताप

point

कोकणकन्या एक्स्प्रेस आणि तेजस एक्स्प्रेसचे वेळापत्रक कोलमडले

Konkan Kanya Express Delay : इंजिनमधील तांत्रिक बिघाडामुळे कोकण रेल्वेवरील वाहतुकीचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसला तब्बल सात तासांचा विलंब झाला असून, याचा थेट परिणाम कोकणकन्या आणि तेजस एक्स्प्रेससह इतर अनेक गाड्यांवर झाला आहे. कोकण रेल्वेवरील अनेक गाड्या पाच ते सात तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांना स्थानकांवर ताटकळत राहावे लागत असून, त्यांच्यात तीव्र नाराजी व संताप व्यक्त होत आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Crime News : स्थानकावर उभी असलेल्या रेल्वेत महिलेवर अत्याचार अन् मर्डर

साडेसहा ते सात तासांच्या विलंबाने प्रवाशांना मोठा मनस्ताप

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी मडगावहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या गाडी क्रमांक 12052 जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये प्रवासादरम्यान बिघाड झाला. या बिघाडामुळे ही गाडी सावंतवाडी स्थानकात चार तास उशिराने, रात्री 8 वाजून 20 मिनिटांनी पोहोचली. रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी पनवेलला येणारी गाडी पहाटे 4 वाजून 20 मिनिटांनी, तर दादर स्थानकात पहाटे 6 वाजता दाखल झाली. तब्बल साडेसहा ते सात तासांच्या या विलंबाने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

कोकणकन्या एक्स्प्रेस आणि तेजस एक्स्प्रेसचे वेळापत्रक कोलमडले

जनशताब्दीच्या बिघाडाचा फटका कोकण रेल्वेवरील इतर प्रमुख गाड्यांनाही बसला. कोकणकन्या एक्स्प्रेस आणि तेजस एक्स्प्रेसचे वेळापत्रक कोलमडले. सर्वसामान्यपणे पहाटे 6 वाजता मुंबईत पोहोचणारी कोकणकन्या एक्स्प्रेस तब्बल साडेपाच तास उशिराने, सकाळी 11 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास मुंबईत दाखल झाली.

हे ही वाचा : ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवताय? पुण्यात FDA च्या कारवाईत काय सापडलं बघाच!

मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांसोबतच मुंबईहून कोकणात जाणाऱ्या गाड्यांनाही विलंबाचा सामना करावा लागत आहे. सलग उशिरा धावणाऱ्या गाड्यांमुळे प्रवाशांचे हाल सुरू असून, रेल्वे प्रशासनाच्या नियोजन आणि देखभालीच्या व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.