Crime News : स्थानकावर उभी असलेल्या रेल्वेत महिलेवर अत्याचार अन् मर्डर

Crime News : ट्रेनच्या एका रिकाम्या डब्यात अंदाजे 50 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. शवविच्छेदन अहवालात या महिलेची हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत या प्रकरणी 31 वर्षीय आरोपीला अटक केली.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

रेल्वेच्या डब्यातील एका सीटखाली महिलेचा मृतदेह

point

पीडितेवर अत्याचार करून हल्ला करत संपवलं 

Crime News : तामिळनाडूतील कन्याकुमारी जिल्ह्यातील नागरकोविल रेल्वे स्थानकावर थांबलेल्या ट्रेनच्या एका रिकाम्या डब्यात अंदाजे 50 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. शवविच्छेदन अहवालात या महिलेची हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत या प्रकरणी 31 वर्षीय आरोपी अय्यप्पन याला अटक केली आहे. 

हे ही वाचा : राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन, मराठवाड्यावर शोककळा

रेल्वेच्या डब्यातील एका सीटखाली महिलेचा मृतदेह

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे 8 वाजता नागरकोविल रेल्वे स्थानकाच्या 13 व्या यार्डात उभ्या असलेल्या ट्रेन क्रमांक 16366 च्या मागील डब्यातील एका सीटखाली महिलेचा मृतदेह आढळून आला. मृतदेह काही दिवस जुना असल्याने तो कुजलेल्या अवस्थेत होता. महिलेचे वय अंदाजे 50 वर्षे असल्याचे सांगण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सुरुवातीला भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम 194 अंतर्गत नोंद करून तपास सुरू केला. मात्र, शवविच्छेदन अहवालात महिलेची हत्या झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण हत्येच्या गुन्ह्यात रूपांतरित केले.

हे ही वाचा : ब्लेडने हातावर प्रियकराचं नाव लिहिलं अन्..., नववीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीसोबत काय घडलं?

पीडितेवर अत्याचार करून हल्ला करत संपवलं 

हा गुन्हा कधी आणि कोणी केला, याचा शोध घेण्यासाठी इन्स्पेक्टर कॅथरीन सुजाता यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले. पथकाने रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता 14 नोव्हेंबरचे महत्त्वाचे फुटेज हाती लागले. या तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयिताची ओळख पटवून 31 वर्षीय अय्यप्पन याला अटक केली. आरोपीने महिलेला प्लॅटफॉर्मवरून जबरदस्तीने रिकाम्या डब्यात ओढून नेले, तिच्यावर अत्याचार केला आणि हल्ला करून तिची हत्या केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.