ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवताय? पुण्यात FDA च्या कारवाईत काय सापडलं बघाच!

पुण्यातील ॲमेझॉन आणि बिगबास्केटच्या दोन बंद स्टोअरमध्ये केलेल्या तपासणीत मुदत संपलेली मिठाई, केक, ब्रेड आणि इतर अनियमितता आढळून आल्या. ॲमेझॉनच्या दुकानातील काही वस्तूंना बुरशी लागली होती, तर दोन्ही ठिकाणी खाण्यायोग्य वस्तूंबरोबरच इतर वस्तूही ठेवल्या होत्या.

ADVERTISEMENT

Pune FDA Action
Pune FDA Action
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

पुण्यात एफडीएची मोठी कारवाई

point

Amazon च्या डार्क स्टोअरमध्ये काय?

Pune FDA Action : पुण्यात ऑनलाइन सामानाची जलद डिलिव्हरी करणाऱ्या Amazon आणि BigBasket या कंपन्यांच्या डार्क स्टोअरमध्ये खाद्यपदार्थांच्या सुरक्षेबाबत गंभीर निष्काळजीपणा समोर आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) केलेल्या तपासणीत या दोन्ही कंपन्यांच्या स्टोअरमध्ये मुदत संपलेले खाद्यपदार्थ आढळले. काही लाडू आणि पेढ्यांवर बुरशी लागल्याचेही दिसून आले, तर केक, ब्रेड आणि मिल्क रस्क यांसारखे पदार्थही एक्सपायरी डेट उलटून गेल्यानंतर स्टोअरमध्ये ठेवण्यात आले होते. या प्रकारानंतर FDA ने दोन्ही स्टोअरचे अन्न परवाने निलंबित केले आहेत.

Amazon च्या डार्क स्टोअरमध्ये काय?

पुण्यातील सिंहगड रोड परिसरात ही तपासणी करण्यात आली. Amazon च्या डार्क स्टोअरचे काम गजानन इन्व्हेंटरीज या कंपनीकडून पाहिले जाते. या स्टोअरमध्ये तपासणीदरम्यान मुदत संपलेले लाडू, पेढे आणि इतर खाद्यपदार्थ आढळले. काही पदार्थांवर बुरशी लागली होती, तर खाद्यपदार्थांच्या डब्यांवर धूळ साचली होती. तसंच तुपाच्या डब्याचे झाकण तुटलेले आणि तेलाच्या कार्टनमधून गळती होत असल्याचेही आढळले. कीटकांचा बंदोबस्त, कर्मचाऱ्यांची स्वच्छता आणि स्टोअरच्या देखभालीबाबतही अनेक त्रुटी आढळून आल्या. विशेष म्हणजे खाद्यपदार्थांसोबत साबणासारख्या इतर वस्तूही ठेवण्यात आल्या होत्या.

हे ही वाचा : Solapur Drought : 300 फूट खोल भीमा सीना बोगद्यात काय आहे? शेतकऱ्यांचा संघर्ष तुम्हीच पाहा..

BigBasket च्या डार्क स्टोअरमध्ये काय?

दुसरीकडे, BigBasket च्या डार्क स्टोअरचे काम इनोव्हेटिव्ह रिटेल कॉन्सेप्ट या कंपनीकडून पाहिले जाते. या स्टोअरमध्ये तपासणीदरम्यान मुदत संपलेले केक, ब्रेड, मिल्क रस्क आणि चटणी आढळली. काही खाद्यपदार्थ थेट जमिनीवर ठेवण्यात आले होते. स्टोअरचे फरशीचे नुकसान झाले होते, तर कोल्ड रूममध्येही स्वच्छतेचा अभाव दिसून आला. याशिवाय तेलाच्या पाकिटांमधून गळती होत होती. कीटकांचा बंदोबस्त करण्यासाठी योग्य उपाययोजना नव्हत्या. खाद्यपदार्थांसोबत बिगरखाद्य वस्तूंचीही साठवणूक करण्यात आली होती.

हे ही वाचा : सात-आठ वर्षांपासून मैत्री आणि प्रेमसंबंध, ब्रेकअपच्या रागातून प्रेयसीचे घरच पेटवलं

ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

या दोन्ही स्टोअरमध्ये अन्नपदार्थांची साठवणूक, स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे FDA च्या तपासणीत स्पष्ट झाले. त्यामुळे अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 (Food Safety and Standards Act, 2006) अंतर्गत दोन्ही स्टोअरचे अन्न परवाने निलंबित करण्यात आले आहेत. ऑनलाइन ऑर्डर केल्यानंतर काही मिनिटांत घरपोच सामान देण्याचा दावा करणाऱ्या कंपन्यांच्या स्टोअरमध्येच खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेबाबत इतकी गंभीर निष्काळजीपणा समोर आल्याने ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.