सातारा : अल्टो कारचा अपघात! डिव्हायडरला धडकून तीन पलट्या; दोघांचा मृत्यू, तिघे जखमी

Satara News : सातारा-पुणे महामार्गावर सुरूर येथे मुंबईहून चिपळूणच्या दिशेने परतणाऱ्या अल्टो कारचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून, चालकाला प्रवासादरम्यान झोप लागल्याने गाडीवरील नियंत्रण सुटून हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली.

ADVERTISEMENT

Satara News
Satara News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

झोपेत चालकाचा ताबा सुटून अल्टो कार डिव्हायडरला धडकली

point

उपचारादम्यान दोघांचा मृत्यू 

Satara News :  सातारा-पुणे महामार्गावर सुरूर येथे मुंबईहून चिपळूणच्या दिशेने परतणाऱ्या अल्टो कारचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून, चालकाला प्रवासादरम्यान झोप लागल्याने गाडीवरील नियंत्रण सुटून हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा : लेकानं वडिलांच्या अपमानाचा घेतला बदला, निर्जनस्थळी 20 वेळा दगडाने ठेचलं

झोपेत चालकाचा ताबा सुटून अल्टो कार डिव्हायडरला धडकली

मिळालेल्या माहितीनुसार, चालकाचा ताबा सुटल्यानंतर MH 14 BK 7933 क्रमांकाची अल्टो कार सर्व्हिस रोडवरील डिव्हायडरला धडकली आणि दोन ते तीन वेळा पलटी झाली. या कारमधून एकूण पाच जण प्रवास करत होते.

उपचारादम्यान दोघांचा मृत्यू 

या भीषण अपघातात वैष्णवी वैभव कदम (वय 43) आणि विजय धोंडू पवार (वय 70, दोघेही रा. चिपळूण) यांचा जागीच अथवा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, चालक वैभव कदम यांच्यासह अन्य तिघे प्रवासी जखमी झाले आहेत.

हे ही वाचा : सिराजला वगळल्याने रणकंदन; रवी शास्त्री, गावस्कर भडकले, तर काँग्रेस खासदाराच्या आरोपाने वादाला राजकीय रंग

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने मदतीसाठी धाव घेतली. सर्व जखमींना तातडीने पुढील उपचारासाठी सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सुरूर परिसरात घडलेल्या या दुर्घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान अपघाताच्या घटनेत सातत्याने वाढ होऊ लागली आहे. यामुळे वाहतूक व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित राहतात.