Govt Jobs : नारळ विकास मंडळात नोकरीची संधी, 2 लाख रुपयांहून अधिक पगार

नारळ विकासात विविध पदांसाठी भरती सुरु झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया नेमकी काय आहे, जाणून घ्या सविस्तर.

ADVERTISEMENT

Coconut Development Board Recruitment
Coconut Development Board Recruitment
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

नारळ विकास मंडळात भरती

point

काय आहेत पात्रतेचे निकष?

point

पगार किती मिळणार?

Coconut Development Board Recruitment : नारळ विकास मंडळात (Coconut Development Board) विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), फील्ड ऑफिसर, डेटा एन्ट्री ऑपरेटर (DEO), स्टेनोग्राफर, डेप्युटी डायरेक्टर, असिस्टंट डायरेक्टर यांसह इतर पदांच्या एकूण 35 जागा भरल्या जाणार आहेत. ही भरती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत केली जाणार असून, गट अ, गट ब आणि गट क संवर्गातील पदांचा यामध्ये समावेश आहे. 

शैक्षणिक पात्रता काय?

या भरतीसाठी पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे. उमेदवारांनी बारावी, पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. काही पदांसाठी इतर विशेष शैक्षणिक पात्रताही निश्चित करण्यात आल्या आहेत. तसेच, पदानुसार कमाल वयोमर्यादा 27 ते 40 वर्षांपर्यंत ठेवण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित पदाची शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा अधिकृत जाहिरातीत तपासणे आवश्यक आहे.

हे ही वाचा : सिराजला वगळल्याने रणकंदन; रवी शास्त्री, गावस्कर भडकले, तर काँग्रेस खासदाराच्या आरोपाने वादाला राजकीय रंग

पगार किती मिळणार?

निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा किंवा मुलाखतीचा समावेश असू शकतो. काही पदांसाठी टायपिंग, शॉर्टहँड आणि संगणकावरील कामाचा वेग यासंबंधीच्या चाचण्या घेतल्या जाणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार 19,900 रुपयांपासून ते 2 लाख 8 हजार 700 रुपयांपर्यंत वेतन मिळणार आहे. अर्जासाठी 300 रुपये शुल्क आकारले जाणार असून, शुल्कातून सूट मिळणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार सवलत दिली जाईल.

हे ही वाचा : सोलापूर : नातवांच्या वेगळ्या वाटा! गणपतराव देशमुखांच्या नातवांमध्ये राजकीय संघर्ष?

'असा' करा अर्ज

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येणार आहे. रोजगार समाचार (Employment News) मध्ये 21 ते 27 नोव्हेंबर 2026 या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीपासून 30 दिवसांच्या आत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. ही थेट भरती असून, निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती भारतातील कोणत्याही ठिकाणी होऊ शकते. इच्छुक उमेदवारांनी नारळ विकास मंडळाच्या अधिकृत वेबसाइट (coconutboard.gov.in) वर जाऊन सविस्तर जाहिरात, अर्जाची प्रक्रिया आणि इतर अटी तपासाव्यात.