मुंबईची खबर : मोनोरेलसंबंधी मोठी अपडेट समोर, मुंबईकरांची प्रतीक्षा कधी संपणार?

मोनोरेल पुन्हा कधी सुरु होणार असा प्रश्न अनेक मुंबईकरांना पडलेला आहे. त्याविषयी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Monorail News
Mumbai Monorail News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

मोनोरेल कधी सुरु होणार?

point

पायाभूत सुविधांची दुरुस्ती पूर्ण झाली का?

Mumbai Monorail News : मोनोरेल कधी सुरु होणार असा प्रश्न अनेक मुंबईकरांना पडला आहे. त्याचं उत्तर आता समोर आलं आहे. मोनोरेलची सेवा 2026 वर्ष संपण्यापूर्वीही पुन्हा सुरू होण्याची शक्यता कमी आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (MMRDA) मोनोरेलच्या सुरक्षेबाबतच्या त्रुटी दूर करण्याचे काम अद्याप सुरू आहे. मोनोरेलच्या उन्नत मार्गावरील दोन मार्गांमधील मोकळ्या जागांबाबत आयआयटी मुंबईने काही महत्त्वाच्या सूचना केल्या होत्या. या जागांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे या जागा सुरक्षितपणे बंद करण्यासाठी एमएमआरडीएकडून उपाययोजना शोधल्या जात आहेत. मात्र, त्यासाठी लोखंडी जाळी किंवा इतर संरक्षक साहित्य वापरल्यास पुलांवर अतिरिक्त वजन पडू शकते. त्यामुळे पुलांच्या मजबुतीवर परिणाम होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.

सुरक्षा उपाय पूर्ण झाल्यानंतरच...

मोनोरेलमध्ये काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढणे हे मोठे आव्हान आहे. कारण इतर रेल्वेप्रमाणे मोनोरेलला मार्गावरील गाईडवेच्या माध्यमातून वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे एखादी मोनोरेल मध्येच बंद पडल्यास दुसऱ्या ट्रेनच्या मदतीने प्रवाशांची सुटका करणे प्रत्येक वेळी शक्य होईलच असे नाही. दरम्यान, नव्याने खरेदी करण्यात आलेल्या मोनोरेलच्या ट्रेनची नियमित देखभाल केली जात असून, आवश्यक सुरक्षा उपाय पूर्ण झाल्यानंतर त्या सेवेत दाखल करण्यासाठी तयार असल्याची माहिती एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हे ही वाचा : सिराजला वगळल्याने रणकंदन; रवी शास्त्री, गावस्कर भडकले, तर काँग्रेस खासदाराच्या आरोपाने वादाला राजकीय रंग

विलंब का होतोय?

मोनोरेलची सेवा 20 सप्टेंबर 2025 पासून बंद आहे. पायाभूत सुविधांची दुरुस्ती आणि आधुनिकीकरण करण्यासाठी मोनोरेल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या कामामध्ये नव्या ट्रेन सुरू करणे, कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल (CBTC) सिग्नलिंग यंत्रणेचे आधुनिकीकरण करणे आणि जुन्या डब्यांची दुरुस्ती करणे अशा महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे. या सर्व सुधारणा पूर्ण झाल्यानंतर मोनोरेलची सेवा अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम होण्याची अपेक्षा आहे. मात्र, सुरक्षा विषयक अडचणी आणि तांत्रिक कामांमुळे सेवा पुन्हा सुरू होण्यास विलंब होत आहे.

हे ही वाचा : मुंबई : तरुण-तरुणीला शिवीगाळ, मारहाण; अल्पवयीन मुलांची क्रूरता, व्हिडीओ व्हायरल

आर्थिक तोटा कमी होणार का?

दुसरीकडे, मोनोरेलच्या आधुनिकीकरणामुळे आर्थिक तोटा कमी होण्याची अपेक्षा आहे. सध्या मोनोरेलला दरवर्षी सुमारे 180 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत असून, सुधारणा पूर्ण झाल्यानंतर हा तोटा 120 कोटी रुपयांपर्यंत खाली येऊ शकतो, असा एमएमआरडीएचा अंदाज आहे. मात्र, मोनोरेलच्या नव्या गाड्या तयार असल्या तरी सुरक्षा उपाय आणि तांत्रिक अडचणी दूर होईपर्यंत मुंबईकरांना या सेवेच्या पुनरारंभासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.