नवी दिल्ली: यूट्यूबर अरमान मलिक आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत असतो. आता मलिक कुटुंबाकडून पुन्हा एकदा गुडन्यूजची हिंट देण्यात आली आहे. अरमानची पत्नी पायल मलिक आणि कृतिका मलिक यांनी नव्या व्लॉगमध्ये घरात लवकरच नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र, या दोघींमध्ये नेमकी कोण प्रेग्नंट आहे, याचा खुलासा त्यांनी अद्याप केलेला नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
ADVERTISEMENT
‘Baby Coming Soon’ लिहिलेला केक
पायल आणि कृतिकाने शेअर केलेल्या व्लॉगमध्ये ‘Baby Coming Soon’ असा संदेश असलेला केक दिसला. यानंतर प्रेग्नन्सीबाबत चर्चा सुरू झाली. मात्र, हा आनंद नेमका कोणासाठी आहे, हे सांगण्यास पायलने नकार दिला.
पायलने सस्पेन्स कायम ठेवत सांगितले की, गुडन्यूज आहे हे नक्की; पण ती कृतिका कडून आहे की पायल कडून, किंवा दोघींकडून, हे सध्या सांगितले जाणार नाही. कृतिकानेही दोघींपैकी कोणाकडून तरी गुडन्यूज असल्याचे संकेत दिले.
तीन महिने पूर्ण झाल्यानंतरच खुलासा?
व्लॉगमध्ये प्रेग्नन्सीबाबत आणखी एक महत्त्वाची हिंट देण्यात आली. पायल आणि कृतिकाने सांगितले की, अद्याप तीन महिने पूर्ण झालेले नाहीत. तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच ही गुडन्यूज नेमकी कोणाची आहे, याचा खुलासा केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
9 मुलांचा बाबा होणार?
व्लॉगमध्ये केक कापताना मुलांचीही उत्सुकता दिसून आली. पायलने कृतिकाकडे केकवर चार कॅंडल का लावल्या आहेत, असा प्रश्न विचारत आता चार मुलं येणार आहेत का, अशी गंमतीशीर चर्चा केली. अरमान मलिकचा याआधीच पाच मुलं आहेत. त्यामुळे आणखी चार मुलं आली तर एकूण संख्या नऊ होईल, अशी चर्चा व्लॉगमध्ये झाली.
अरमान मलिक यांना सध्या पाच मुलं
अरमान मलिकला सध्या पाच मुलं आहेत. पायल मलिकसोबत त्याला चिरायू मलिक, अयान, तूबा आणि रुद्र मलिक अशी चार मुलं आहेत. तर कृतिका मलिकसोबत त्यांना जैद मलिक हा मुलगा आहे.
घर छोटं पडतंय, आता फार्महाऊसची चर्चा
कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढत असल्याने सध्याचं घर छोटं पडत असल्याचंही कृतिकाने व्लॉगमध्ये सांगितलं. त्यामुळे आता मोठा व्हिला किंवा फार्महाऊस घेण्याचा विचार सुरू असल्याचे संकेत तिने दिले आहेत.
दरम्यान, पायल आणि कृतिकाच्या या सस्पेन्समुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. मात्र, सध्या उपलब्ध माहितीनुसार नेमकी पायल प्रेग्नंट आहे की कृतिका, किंवा दोघीही प्रेग्नंट आहेत, याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
ADVERTISEMENT












