पार्सल पोहोचविण्याच्या घाईत भरधाव ट्रकने दिली धडक, डिलिव्हरी बॉयचा दुर्दैवी मृत्यू

मिथिलेश गुप्ता

• 03:37 PM • 20 Nov 2026

Ulhasnagar News : पार्सल वेळेत पोहोचविण्याच्या घाईत भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत 32 वर्षीय डिलिव्हरी बॉयचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली.

Ulhasnagar News

Ulhasnagar News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

दुचाकीला भरधाव ट्रकची जोरदार धडक

point

रुग्णालयात सुरजचा उपारादरम्यान मृत्यू

Ulhasnagar News : पार्सल वेळेत पोहोचविण्याच्या घाईत भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत 32 वर्षीय डिलिव्हरी बॉयचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली. सूरज उर्फ सागर श्रीकृष्ण खरे असे मृत तरुणाचे नाव असून, तो कुटुंबाचा एकुलता एक आधार होता. या घटनेमुळे खरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Astrology : 'या' राशीतील लोकांचे होणार कौतुक, 12 राशींचे जाणून घ्या भविष्य

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर कॅम्प नंबर 5 येथील गणेशनगर परिसरात राहणारा सूरज हा यापूर्वी एका डिलिव्हरी कंपनीत काम करत होता. गुरुवारी तो पुन्हा या कंपनीत रुजू झाला होता. कामाच्या पहिल्याच दिवशी पार्सल वेळेत पोहोचविण्याच्या धावपळीत असताना दुपारी 1 वाजेच्या सुमारास तो दुचाकीवरून श्रीराम चौकाच्या दिशेने जात होता.

दुचाकीला भरधाव ट्रकची जोरदार धडक

बाबा प्राईम हॉलसमोरील स्वर्गीय केणे चौकात त्याच्या दुचाकीला एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत सूरज दुचाकीवरून खाली कोसळला आणि ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने त्याचा जागीच गंभीर जखमी झाला. अपघातानंतर परिसरात बघ्यांची गर्दी जमली, मात्र सुरुवातीला कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही.

रुग्णालयात सुरजचा उपारादरम्यान मृत्यू

घटनेची माहिती मिळताच स्थानिक भाजप पदाधिकारी नीलेश बोबडे यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने जखमी सूरजला रिक्षातून तात्काळ मध्यवर्ती रुग्णालयात नेले. शाखाप्रमुख गोविंद पारडे यांनीही रुग्णालयात धाव घेतली. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हे ही वाचा :  पुस्तक प्रकाशन सोहळ्यात सोनिया गांधींच्या रांगेत 'या' नेत्यांना जागा, फोटो व्हायरल

दरम्यान, या घटनेनंतर विठ्ठलवाडी पोलिसांनी अपघाताची नोंद करून ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. सूरजच्या पश्चात आई, तीन बहिणी (त्यातील दोघी विवाहित) असा परिवार आहे. त्याचे वडील शिलाईकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. "सूरज आमच्या घराचा एकुलता एक आधारवड होता, या अपघाताची सखोल चौकशी करण्यात यावी," अशी मागणी कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे.