मुंबईची खबर : पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय, लवकरच येणार प्रीपेड टॅक्सी

पृथ्वीराज पाटील

• 04:59 PM • 18 Nov 2026

पश्चिम रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील प्रमुख स्थानकांवर प्रीपेड टॅक्सी आणि रिक्षा सेवा सुरू करण्याची योजना आखली आहे.

Mumbai News

Mumbai News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

प्रमुख रेल्वेस्थानकांवर प्रीपेड टॅक्सी

point

काय आहे पश्चिम रेल्वेचा निर्णय?

मुंबई : लांब पल्ल्याच्या लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. पश्चिम रेल्वेने मुंबईतील प्रमुख स्थानकांवर प्रीपेड टॅक्सी आणि रिक्षा सेवा सुरू करण्याची योजना आखली आहे. यामुळे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. सुरवातीला ही सेवा मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे टर्मिनस, बोरीवली, विरार आणि पालघर या सहा महत्त्वाच्या स्थानकांवर सुरू केली जाणार असून, यासाठी लवकरच टेंडर प्रक्रिया राबवली जाईल.

हे वाचलं का?

मनमानी भाडेवसुलीविरोधात उपाय

अनेकदा रात्रीच्या वेळी किंवा सणासुदीला काही चालक मनमानी भाडे वसुल करताना दिसतात. यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. यावर तोडगा काढण्यासाठी प्रवाशांना स्थानकावरील प्रीपेड काऊंटरवर जाऊन प्रवासाचा तपशील द्यावा लागेल, जिथे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने भाडे ठरवून पावती दिली जाईल, ज्यामुळे विनाकारण होणारी भाडेवाढ थांबण्यास मदत होईल.

हे ही वाचा : नवी मुंबई : कर्ज घेतलं, पण हप्ते थकवले; संतापलेल्या जामीनदाराने 23 वर्षीय तरुणासोबत केलं नको तेच!

रेल्वे अधिकाऱ्यांनी काय सांगितले?

मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर आणि पुण्यात अशा सुविधा आधीच सुरू असल्या तरी मुंबईतील स्थानकांवर असलेल्या जागेच्या कमतरतेमुळे येथे ती अजून लागू झालेली नाही. मात्र योग्य प्रस्ताव मिळाल्यास मध्य रेल्वेही याचा गांभीर्याने विचार करू शकते. दरम्यान, चालकांसाठीचे भाडे आणि प्रोत्साहन योग्य ठेवण्याची सूचना चालक संघटनांनी केली असून, ही योजना यशस्वी ठरल्यास मुंबईत दाखल होणाऱ्या हजारो प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व सुरक्षित होईल.

हे ही वाचा : बीड : 'तो' संशय अन् दोन मित्रांना ट्रॅक्टरला बांधून अमानुष मारहाण, एकाचा मृत्यू

कशी असेल व्यवस्था?

या सुविधेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी काळ्या-पिवळ्या टॅक्सी आणि ओला-उबरसारख्या ॲप-आधारित कॅबसाठी स्वतंत्र रांगांची व्यवस्था केली जाऊ शकते. तसेच, पश्चिम रेल्वे वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) समन्वयाने स्थानक परिसरात विनापरवाना चालणाऱ्या गाड्यांवर कडक कारवाई करणार असून, या पहिल्या टप्प्याच्या यशानंतर ही सेवा इतर स्थानकांवरही विस्तारली जाऊ शकते.