अगं बाई...! कोल्हापुरात 6 डझन रत्नागिरी हापूस अंब्याचा भाव 55,000 रुपयांना

Kolhapur News : कोल्हापूर फळ मार्केट येथे बाजार समितीचे चेअरमन गणेश देसाई व संचालक मंडळाच्या उपस्थितीत रत्नागिरी हापूस आंब्याच्या सौद्याला आता प्रारंभ झालेला आहे. आंबा सौद्याच्या दरात 20 हजार रुपये पेटी अशी बोली लावण्यात आली होती. मात्र, आता या हापूस आंब्याच्या पेटीचा भाव तब्बल 55 हजार रूपयांपर्यंत पोहोचला आहे.

Kolhapur News

Kolhapur News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

कोल्हापूरमध्ये रत्नागिरी हापूस आंब्याच्या सौद्याला आता प्रारंभ

point

55 हाजार रुपये लावली आंब्याची बोली

Kolhapur News : कोल्हापूर फळ मार्केट येथे बाजार समितीचे चेअरमन गणेश देसाई व संचालक मंडळाच्या उपस्थितीत रत्नागिरी हापूस आंब्याच्या सौद्याला आता प्रारंभ झालेला आहे. आंबा सौद्याच्या दरात 20 हजार रुपये पेटी अशी बोली लावण्यात आली होती. मात्र, आता या हापूस आंब्याच्या पेटीचा भाव तब्बल 55 हजार रूपयांपर्यंत पोहोचला आहे. गणेश वाळुंज यांनी ही बोली लावल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे हापूस आंब्यांची राज्यात पुन्हा जोरदार चर्चा सुरू झाली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : घराबाहेर खेळत होती 3 वर्षीय मुलगी, अल्पवयीन मुलांकडून अत्याचार

कोकण, रत्नागिरी आणि राजापूर येथील हापूस 

यासीन बालमभाई बागवान YBB फ्रुट दुकान या ठिकाणी आंबा उत्पादक असलेले शेतकरी स्वप्निल तांबे आणि तानाजी तांबे या दोन्ही भावांच्या बागेतील आंबा हा कोकण, रत्नागिरी आणि राजापूर येथील आहे. रत्नागिरी हापूस आंब्याची 6 डजनाची पेटी 55 हजार रुपये बोली लावून यातून एक आंबा 763 रुपयांना पडला होता. 

हे ही वाचा : छठपुजा सुरू असताना लेकीनं खाल्ला प्रसाद, आईनं 4 वर्षांच्या चिमुकलीला संपवलं

एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट आहे, मात्र कोल्हापूरच्या मार्केट यार्ड इथल्या आंब्याच्या सौद्याच्या दरामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या दुष्काळातच सावट कमी होईल अशी अपेक्षा आहे.