घराबाहेर खेळत होती 3 वर्षीय मुलगी, अल्पवयीन मुलांकडून अत्याचार
Crime News : घराबाहेर खेळत असलेल्या तीन वर्षीय बालिकेचे दोन किशोरवयीन मुलांनी अपहण करून लैंगिक अत्याचार केल्याची घटना आहे. मुलीच्या मावशीने घटनास्थळी धाव घेताच आरोपी मुलीला बेशुद्ध अवस्थेत सोडून पळून गेले होते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अल्पवयीन मुलांकडून तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार
आरोपींवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा
Crime News : घराबाहेर खेळत असलेल्या तीन वर्षीय बालिकेचे दोन अल्पवयीन मुलांनी अपहण करून लैंगिक अत्याचार केल्याची घटना आहे. मुलीच्या मावशीने घटनास्थळी धाव घेताच आरोपी मुलीला बेशुद्ध अवस्थेत सोडून पळून गेले होते. या खळबळजनक घटनेनंतर ग्रामस्थांनी पंचायतीत दोन्ही पक्षांमध्ये समेट घडवून आणला होता. रविवारी सकाळी आई वडिलांनी मुलीला पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले. त्यानंतर गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींचा शोध सुरू आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथील आहे.
हे ही वाचा : बायको परपुरूषासोबत नको त्या स्थितीत, नवऱ्याने पाहिलं अन् कुऱ्हाडीनं दोघांना संपवलं
अल्पवयीन मुलांकडून तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार
संबंधित घटना ही पोलीस ठाणे परिसरातील एका गावातील आहे. शनिवारी दुपारी 3:30 वाजता, शेजारी राहणाऱ्या एका 15 वर्षीय मुलाने, त्याच्या 14 वर्षीय मित्रासोबत मिळून घराबाहेर खेळत असलेल्या तीन वर्षांच्या मुलीचे तोंड दाबत गवताच्या ढिगाऱ्यावर नेले. तिथे त्या दोघांनी मुलीवर सामूहिक अत्याचार केला. दरम्यान, जेव्हा मुलीची मावशी आवारात पोहोचली असता, आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला, तेव्हा आरोपी पळून गेला. तिने मुलीला बेशुद्ध अवस्थेत घरी आणले आणि कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली. यानंतर आरोपीचे नातेवाईक गावकऱ्यांसोबत मुलीच्या घरी पोहोचले होते.
सुरुवातीला या घटनेनंतर पंचायत बोलावण्यात आली होती. ग्रामस्थांनी उपस्थित कॉहून पंचायत सभेद दोन्ही पक्षांमध्ये तडजोड करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रात्री मुलीची प्रकृती बिघडली होती. पीडितेच्या आई वडिलांनी रविवारी सकाळी पोलीस ठाण्यात नेऊन आरोपींवर तक्रार दाखल केली.
हे ही वाचा : छठपुजा सुरू असताना लेकीनं खाल्ला प्रसाद, आईनं 4 वर्षांच्या चिमुकलीला संपवलं
आरोपींवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा
या घटनेनंतर पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, सामाजात मुलीची बदनामी होईल, यावरून त्यांनी याबाबत कोणाला सांगितलं नाही. मुलीची प्रकृती जशी खालावली तशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. नारखीचे निरीक्षक संजय कुमार पांडे यांनी फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळी दाखल झाले. आईच्या तक्रारीनुसार, लैंगिक अत्याचार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आरोपी किशोरवयीन मुलांचा शोध सुरू आहे.
