बायको परपुरूषासोबत नको त्या स्थितीत, नवऱ्याने पाहिलं अन् कुऱ्हाडीनं दोघांना संपवलं

Crime News : नवऱ्याने आपल्या बायकोसह तिच्या कथित प्रियकराची निर्घृणपणे हत्या केल्याची दुर्दैवी घटना आहे. आरोपी नवऱ्याने पत्नीसह तिच्या प्रियकराला घरात नको त्याच अवस्थेत पाहिलं होतं, याचाच नवऱ्याला राग आला आणि त्याने कुऱ्हाडीने दोघांवर हल्ला करत संपवलं.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

महिला आणि पुरूष भेटण्यासाठी एकत्र आले

point

खोलीत अपत्तीजनक स्थितीत पाहताच नवऱ्याने दोघांना संपवलं 

Crime News : नवऱ्याने आपल्या बायकोसह तिच्या कथित प्रियकराची निर्घृणपणे हत्या केल्याची दुर्दैवी घटना आहे. आरोपी नवऱ्याने पत्नीसह तिच्या प्रियकराला घरात नको त्याच अवस्थेत पाहिलं होतं, याचाच नवऱ्याला राग आला आणि त्याने कुऱ्हाडीने दोघांवर हल्ला करत संपवलं. यानंतर पोलिसांनी आरोपी नवऱ्याला अटक केली आणि घटनास्थळावरील कुऱ्हाड ताब्यात घेतली. ही दुर्दैवी घटना झारखंडच्या लोहरगदा जिल्ह्यातील आहे. या घटनेनं परिसर पूरता हादरून गेला आहे. 

हे ही वाचा : छठपुजा सुरू असताना लेकीनं खाल्ला प्रसाद, आईनं 4 वर्षांच्या चिमुकलीला संपवलं

महिला आणि पुरूष भेटण्यासाठी कुम्भाटोली

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, लोहरगदा भंडारा ठाणे क्षेत्रात कुम्भाटोली निवासी सोनू लहेरी याची पत्नी पूजा देवी अशी ओळख समोर आली. तसेच प्रियकराची ओळख रोहित लहेरी अशी आहे. या दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर अधिक संवाद वाढल्याने मैत्रीचे नात्यात रुपांतर झाले होते. रविवारी छठ पुजेच्या निमित्ताने रोहित लहेरी प्रेमिका पूजा देवीला भेटण्यासाठी कुम्भाटोली येथे पोहोचला. 

खोलीत अपत्तीजनक स्थितीत पाहताच नवऱ्याने दोघांना संपवलं 

पत्नीच्या खोलीत कोणीतरी परपुरुष असल्याचा त्याला सुगावा लागला होता. त्यानंतर नवरा सोनू हा अचानक आपल्या घरी पोहोचला असता, पत्नी पूजा आणि रोहित हे खोलीत अपत्तीजनक स्थितीत होते, त्यांनी सर्व देहभान विसरले होते. पती सोनूने घरात ठेवलेली कुऱ्हाड उचलली आणि दोघांवर हल्ला केला आणि दोघांची हत्या केली. 

हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यातील 'या' जिल्ह्यांत हुडहुडी भरणार, IMD चा अंदाज घ्या जाणून

या घटनेची माहिती परिसरात पसरताच एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती भंडरा पोलिसांना मिळताच, पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि आरोपी सोनू लहेरीला अटक केली. आरोपीने खूनासाठी वापरलेली कुऱ्हाड पोलिसांनी ताब्यात घेतली. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.