Maharashtra Weather : राज्यातील 'या' जिल्ह्यांत हुडहुडी भरणार, IMD चा अंदाज घ्या जाणून
Maharashtra Weather : नोव्हेंबर महिन्याच्या मध्यात राज्यात हळूहळू गारठा वाढण्याची शक्यता आहे. पहाटे आणि रात्री गारवा जाणवण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाची महत्त्वाची माहिती पुढीलप्रमाणे..
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नोव्हेंबर महिन्याच्या मध्यात राज्यात हळूहळू गारठा वाढण्याची शक्यता
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाची महत्त्वाची माहिती पुढीलप्रमाणे..
Maharashtra Weather : नोव्हेंबर महिन्याच्या मध्यात राज्यात हळूहळू गारठा वाढण्याची शक्यता आहे. पहाटे आणि रात्री गारवा जाणवण्याची शक्यता आहे. तर दुपारच्या वेळी उन्हाचा चटका काय राहील. यामुळे सकाळी थंडावा आणि दुपारीदरम्यान हवामान उष्ण होण्याची शक्यता आहे. याबाबत भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाची महत्त्वाची माहिती पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आली.
हे ही वाचा : कल्याणमध्ये पोलीस कुटुंबाला गुंडांकडून मारहाण, पीडितांची मनसेकडे धाव
कोकण
कोकणात मुंबई, पालघर, ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील सागरी किनारपट्टीलगतच्या भागात थंडीचा अधिक प्रभाव आहे. मुंबईसह उपनगरांत आकाश निरभ्र राहणार आहे. दिवसा उन्हाचा चटका आणि कोकणात कडाक्याच्या थंडीपेक्षा उबदार वातावरणाची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र
मध्य महाराष्ट्रात पुणे, नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगर परिसरात पहाटे तापमानात घट होण्याची शक्यता आहे. पुणे शहरात सोमवारी मुख्यत्वे आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. सकाळच्या तुलनेत थंड वातावरण राहील.
मराठवाडा
मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांत सोमवारी हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. याच भागात पहाटे आणि रात्री तापमान तुलनेनं कमी राहण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : दुकानात काम करणाऱ्या तरुणीची चेंजिंग रुममध्ये हत्या
विदर्भ
विदर्भात नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गोंदिया येथे हवामान वेगळे राहण्याची शक्यता आहे. विदर्भात पहाटे थंडी कमी जाणवेल, तर रात्री गारवा जाणवेल.
