राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या राजीनाम्याची घोषणा, वारसदारही केला घोषित
Prakash Solanke Retirenment : बीडच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आलेली आहे. आमदार प्रकाश सोळंके यांनी मोठा राजकीय निर्णय घेत निवृत्तीची घोषणा केली. सोळंके यांनी आपला राजकीय वारसदाराची देखील घोषणा केल्याची माहिती समोर आलेली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बीडच्या राजकारणातून मोठी बातमी समोर
आमदार प्रकाश सोळंके यांचा राजकीय निर्णय
Prakash Solanke Retirenment : बीडच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आलेली आहे. आमदार प्रकाश सोळंके यांनी मोठा राजकीय निर्णय घेत निवृत्तीची घोषणा केली. सोळंके यांनी आपला राजकीय वारसदाराची देखील घोषणा केल्याची माहिती समोर आलेली आहे. या घटनेनं बीडच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सोळंके यांनी पुतण्या जयसिंग सोळंके यांना विधानसभेची संधी देण्यात आली.
हे ही वाचा : कल्याणमध्ये पोलीस कुटुंबाला गुंडांकडून मारहाण, पीडितांची मनसेकडे धाव
राजकीय वारसदार म्हणून पुतण्याला संधी
माजलगावचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी विकासकामाच्या सुभारंभप्रसंगा मोठी घोषणा केली. आपला राजकीय वारसदार म्हणून पुतण्या जयसिंग सोळंके यांना विधानसभेची संधी दिली आहे. आमच्याकडून पुतणे जयसिंग सोळंके यांना उमेदवारी दिली जाईल असे ते म्हणाले. त्यांच्या या घोषणेमुळे माजलगावच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
जयसिंग सोळंके नेतृत्वाची नवी इनिंग सुरू होणार का?
सोळंके माजलगावातील राजकारणातून माघार घेण्यात आल्याचे संकेत आहे. आता माजलगावच्या राजकारणात जयसिंग सोळंके यांच्या नेतृत्वाची नवी इनिंग सुरू होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
हे ही वाचा : बापाने 10 वर्षीय लेकावर तेल ओतून पेटवलं, गंभीररित्या भाजला मुलगा
प्रकाश सोळंकेची राजकीय कारकिर्द
प्रकाश सोळंके हे बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.
प्रकाश सोळंके यांची राजकीय कारकिर्द जिल्हा परिषद सदस्य म्हणून सुरू झाली.
1999 साली विधानसभा निवडणुकीत ते पहिल्यांदा भाजपच्या उमेदवारीवर माजलगाव मतदारसंघातून निवडून आले.
नंतर पुढे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडले गेले.
