बापाने 10 वर्षीय लेकावर तेल ओतून पेटवलं, गंभीररित्या भाजला मुलगा

Crime News : बापानेच आपल्या पोटच्या बाळावर तेल ओतून जिवंत जाळल्याची ही दुर्दैवी घटना आहे. या हल्ल्यात मुलगा गंभीररित्या भाजला गेला आहे. सुदैवाने शेजारी व्यक्तीच्या सतर्कतेमुळे मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

पती-पत्नीत सतत वाद

point

10 वर्षांचा अंश हा आगीत होरपळला

Crime News : बापानेच आपल्या पोटच्या बाळावर तेल ओतून जिवंत जाळल्याची ही दुर्दैवी घटना आहे. या हल्ल्यात मुलगा गंभीररित्या भाजला गेला आहे. सुदैवाने शेजारी व्यक्तीच्या सतर्कतेमुळे मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अशातच मुलाची सध्या प्रकृती चिंताजनक आहे. घडलेल्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर दाखल झालेल्या पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला. ही घटना हरियाणातील औद्योगिक विकास शहर फरिदाबाद येथील आहे. 

हे ही वाचा : दुकानात काम करणाऱ्या तरुणीची चेंजिंग रुममध्ये हत्या

पती-पत्नीत सतत वाद

पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना संजय कॉलनीतील लाल कोठीजवळील आहे. प्राथमिक तपासात पती-पत्नीत वाद झाला होता. घडलेल्या घटनेनुसार, परिसरात राहणाऱ्या रेणूचा तिच्या पतीसोबत बऱ्याच काळापासून वाद होता. याच वादाने ती संजय कॉलनीत त्यांच्यापासून वेगळी राहत होती, पती रामनगर येथे राहत होता. 

10 वर्षांचा अंश हा आगीत होरपळला

संबंधित प्रकरणात असा आरोप करण्यात आला की, पतीने रेणूच्या खोलीत प्रवेश केला आणि 10 वर्षांचा अंश हा आगीत होरपळत होता. पीडितेच्या आईच्या म्हणण्यानुसार, तिचा पती कोणतेही काम करत नव्हता. त्यामुळेच ती बऱ्याच काळापासून त्याच्यापासून विभक्त रहत होती. 

हे ही वाचा : भावाच्या वादात बहिणीनं विचारला जाब, तरुणांनी गोळीबार करत संपवलं

रेणुने चौकशीदरम्यान पोलिसांना माहिती दिली की, तिला पाच मुलं आहेत. तिची मोठी मुलगी ही विवाहित असून उर्वरित चार मुले तिच्यासोबतच राहतात. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सर्व संबधितांचे जबाब नोंदवून प्रकरणाचा तपास केला. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीला ताब्यात घेण्यात आले.