मुंबईची खबर : मुंबईकरांनो लक्ष द्या! 16 ते 19 नोव्हेंबरदरम्यान वाहतुकीत मोठे बदल; वाचा सविस्तर

16 ते 19 नोव्हेंबर दरम्यान दक्षिण मुंबईत प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या काळाता वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत.

ADVERTISEMENT

Mumbai Traffic Restrictions
Mumbai Traffic Restrictions
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

दक्षिण मुंबईत वाहतुकीत मोठे बदल

point

नेमकं कारण काय?

Mumbai Traffic Restrictions : मुंबईत प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 16 ते 19 नोव्हेंबरदरम्यान VVIP दौऱ्यानिमित्त दक्षिण मुंबईतील अनेक भागांत तात्पुरते वाहतूक निर्बंध, मार्ग बदल आणि पार्किंग बंदी लागू करण्यात आली आहे. ब्रिटनचे प्रिन्स विल्यम हे 16 ते 18 नोव्हेंबरदरम्यान 'अर्थशॉट प्राईज समिट' आणि पुरस्कार सोहळ्यासाठी मुंबईत येत असून, त्याच पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी ही अधिसूचना जारी केली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे आदेश काढले असून, हुतात्मा राजगुरू चौक, बॅलार्ड पियर आणि एनसीपीए (NCPA) परिसरातील वाहतुकीवर याचा परिणाम होणार आहे.

वाहतूक निर्बंध कुठे?

या अधिसूचनेनुसार, 16 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत हुतात्मा राजगुरू चौकात मादाम कामा रोडवरून फ्री प्रेस रोडकडे जाणारे उजवे वळण तसेच फ्री प्रेस रोडवरील उत्तरवाहिनीवरून दक्षिणवाहिनीकडे जाणारा 'यू-टर्न' केवळ अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांसाठी खुला राहील. याशिवाय, 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत शहीद भगतसिंग मार्गापासून अवतारसिंग बेदी चौक आणि तिथून उजवीकडे वळून वालचंद हिराचंद मार्गाकडे जाणारा रस्ता फक्त व्हीव्हीआयपी वाहनांसाठीच खुला ठेवण्यात आला आहे. याच कालावधीत एन. मोरारजी रोड हा दक्षिण-उत्तर वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहील.

हे ही वाचा : Govt Jobs : सरकारने जाहीर केली तलाठी पदांसाठी मेगाभरती, काय आहेत पात्रतेचे निकष?

इथे वाहने पार्क करण्यास बंदी

वाहतूक बदलांसोबतच या परिसरात कडक पार्किंग निर्बंधही लागू करण्यात आले आहेत. 16 ते 19 नोव्हेंबरदरम्यान विनय के. शाह मार्ग (एनसीपीए चौक ते मुरली देवरा चौक) आणि दोराबजी टाटा रोड (गेंडा पॉइंट ते मुरली देवरा चौक) या दोन रस्त्यांवरील 'पे अँड पार्क' सुविधा चोवीस तास बंद राहतील. तसेच, 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत एन. मोरारजी रोड, जे. एन. हेरडिया मार्ग आणि वालचंद हिराचंद मार्ग या रस्त्यांवर वाहने उभी करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

हे ही वाचा : एक इंजेक्शन अन् 17 वर्षीय प्राचीचा मृत्यू, संतापलेल्या लोकांनी मेडिकलला लावली आग; नेमकं प्रकरण काय?

पर्यायी मार्गाचे नियोजन करा

पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, हे निर्बंध रुग्णवाहिका, पोलीस वाहने, अग्निशमन दल आणि इतर अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना लागू राहणार नाहीत. ही तात्पुरती व्यवस्था केवळ दौऱ्याच्या कालावधीपुरतीच मर्यादित आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईतून, विशेषतः बॅलार्ड पियर आणि एनसीपीए परिसरातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी वेळेचे आणि पर्यायी मार्गांचे नियोजन करूनच प्रवास करावा, असे आवाहन मुंबई वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.