ब्रेकअपनंतर गर्लफ्रेंडच्या दोन पाळीव कुत्र्यांची हत्या; प्रियकराला पोलिसांनी उचललं, नेमकं काय घडलं?

Crime News : ब्रेकअपच्या रागातून तरुणाने गर्लफ्रेंडच्या दोन पाळीव कुत्र्यांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पश्चिम बंगालमधील जादवपूरमध्ये घडलेल्या या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

ब्रेकअपनंतर गर्लफ्रेंडच्या दोन पाळीव कुत्र्यांची हत्या

point

प्रियकराला पोलिसांनी उचललं, नेमकं काय घडलं?

Crime News : पश्चिम बंगालमधील जादवपूर परिसरात ब्रेकअपच्या रागातून तरुणाने गर्लफ्रेंडच्या दोन पाळीव कुत्र्यांची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून, त्याच्या मानसिक स्थितीबाबतही तपास सुरू आहे. पश्चिम बंगालमधील जादवपूरच्या बिक्रमगड परिसरात ही घटना घडली. संजीब भट्टाचार्य असं आरोपी तरुणाचं नाव आहे. 

हेही वाचा : चेंजिंग रुममध्ये 18 वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ, कपड्यांच्या शोरुममध्ये काय घडलं?

काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू

स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजीब आणि परी नोव्हा हे दोघे भाड्याच्या घरात एकत्र राहत होते. त्यांच्याकडे अनेक पाळीव कुत्रे होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होते. या वादातून शुक्रवारी परीने संजीबसोबतचं नातं संपवण्याचा निर्णय घेतला आणि घर सोडून ती निघून गेली. यामुळे संजीब नाराज होता. त्यानंतर शनिवारी संजीबने परीला व्हिडीओ कॉल केला. या कॉलदरम्यान परीला तिच्या एका पाळीव कुत्र्याच्या गळ्यात फास असल्याचं आणि तो लटकलेल्या अवस्थेत असल्याचं दिसलं. हे दृश्य पाहून परीला धक्का बसला. तिने तातडीने एका स्थानिक व्यक्तीला संबंधित घरात पाठवलं. त्या व्यक्तीने घरात जाऊन पाहिलं असता दोन्ही कुत्रे मृतावस्थेत आढळले. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण घरात रक्त पसरलेलं होतं.

काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू

या घटनेची माहिती मिळताच अभिनेत्री आणि प्राण्यांसाठी काम करणाऱ्या देबलीना दत्ता घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी राज्य सरकारमधील मंत्री अग्निमित्रा पॉल यांच्याशी संपर्क साधून आरोपीविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर जादवपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संजीब भट्टाचार्य याला ताब्यात घेतलं. दरम्यान, परी नोव्हा हिनेही या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. संजीब गेल्या सहा ते सात महिन्यांपासून आपला छळ करत असल्याचा आरोप तिने केला आहे. तसेच, संजीबने आपल्याला मारहाण केल्याचाही दावा परीने केला आहे. दोघांमधील वाद आणि ब्रेकअपनंतर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपी संजीब भट्टाचार्य याच्या मानसिक स्थितीबाबत संशय व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, त्याच्या मानसिक स्थितीबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष समोर आलेला नाही. ब्रेकअपनंतर गर्लफ्रेंडच्या पाळीव कुत्र्यांची हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. परी नोव्हा हिने यापूर्वीही आपल्याला त्रास दिला जात असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे या प्रकरणात कुत्र्यांच्या मृत्यूबरोबरच परीने केलेल्या छळ आणि मारहाणीच्या आरोपांचाही तपास होणार आहे. सध्या पोलिसांनी संजीबला ताब्यात घेतलं असून, पुढील तपास सुरू आहे.