अल्पवयीन मुलीवर हॉटेलमध्ये नेत सामूहिक बलात्कार, ABVP च्या नेत्यासह चौघांना अटक

एका अल्पवयीन मुलीवर हॉटेलमध्ये नेत अत्याचार करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अभाविपच्या नेत्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

point

चौघांना अटक

point

हॉटेलमध्ये काय घडलं?

Crime News : एका अल्पवयीन मुलीवर हॉटेलमध्ये सामूहिक बलात्कार केल्याची अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एबीव्हीपीचे (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) एमबीपीजी कॉलेज विद्यार्थी युनियन निवडणुकीचे अध्यक्षीय उमेदवार धीरज बिश्तसह चार जणांना अटक केली आहे. उत्तराखंडमधील नैनीताल जिल्ह्यातील हल्द्वानी येथे ही घटना घडली. नैनीतालचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मंजुनाथ टी.सी. यांनी शुक्रवारी (14 नोव्हेंबर) याबाबतची माहिती दिली असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

हॉटेलमध्ये नेत अत्याचार

पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी मुंखानी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, चारही आरोपींनी अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून आणि जबरदस्तीने मुंखानी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये नेले. तिथे आरोपींनी तिला धमकावून आणि धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केला. या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा : चेंजिंग रुममध्ये 18 वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ, कपड्यांच्या शोरुममध्ये काय घडलं?

कोण आहेत चार आरोपी?

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ विविध तपास पथके तयार करून हॉटेलची पाहणी केली आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासासाठी ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात आणि सीसीटीव्ही पुराव्यांवरून घटनेची पुष्टी झाली असून, पोलिसांनी अवघ्या काही वेळातच चारही आरोपींना अटक केली आहे. धीरज बिश्त व्यतिरिक्त इतर तिन्ही आरोपींची नावे नितीन पाल, अंश खत्री आणि हिमांशू बोनी अशी असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा : सोलापूर : लोखंडी पाईपमध्ये चाकू अडकवून तरुणावर सपासप वार, भरदिवसा मोबाईल शॉपीत काय घडलं?

वैद्यकीय तपासणी

सध्या पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी आणि इतर आवश्यक कायदेशीर औपचारिकता पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली असून, याप्रकरणी कायद्यानुसार अत्यंत कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट विश्वास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिला आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे.