गोकुळ संघाच्या दूध पहिल्याच बैठकीत मोठा वाद, आता अध्यक्ष राजेश पाटील म्हणाले...

Gokul first meeting dispute directors seating arrangement : गोकुळच्या पहिल्याच संचालक मंडळाच्या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधी संचालकांमध्ये खुर्च्यांवरून वाद झाला. 24 कोटींचा तोटा आणि दूध दरवाढीबाबत अध्यक्ष राजेश पाटील यांनी काय सांगितलं?

ADVERTISEMENT

Gokul first meeting dispute directors
Gokul first meeting dispute directors
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

गोकुळ संघाच्या पहिल्याच बैठकीत मोठा वाद,

point

आता अध्यक्ष राजेश पाटील म्हणाले...

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या पहिल्याच संचालक मंडळाच्या बैठकीत वाद झाल्याचं पाहायला मिळालं. सत्ताधारी आणि विरोधी संचालकांमध्ये बसण्याच्या जागेवरून शाब्दिक चकमक झाली. अध्यक्ष राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीतील वादाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे पहिल्याच बैठकीत नेमकं काय घडलं, याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, बैठकीत मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन करण्यात आले. या बैठकीला सर्व 25 संचालक आणि शासन नियुक्त चार संचालक उपस्थित होते. सर्व विषयांवर खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाल्याचा दावा अध्यक्ष राजेश पाटील यांनी केला. मात्र, बैठकीच्या सुरुवातीला सत्ताधारी आणि विरोधी गटातील संचालकांमध्ये खुर्च्यांवरून वाद झाल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा : जबरदस्ती दारू पाजली, साडी नेसवून 20 वर्षीय तरुणावर अत्याचार; 19 जणावर गुन्हा

6 महिन्यांत सुमारे 24 कोटी रुपयांचा तोटा झाल्याचा मुद्दाही बैठकीत चर्चेला

गोकुळच्या प्रशासकीय कारकिर्दीत मागील सहा महिन्यांत सुमारे 24 कोटी रुपयांचा तोटा झाल्याचा मुद्दाही बैठकीत चर्चेला आला. हा तोटा भरून काढण्यासाठी पुढील 130 दिवसांत कोणत्या उपाययोजना करता येतील, यावर संचालक मंडळात चर्चा झाल्याचं राजेश पाटील यांनी सांगितलं. गोकुळ सध्या सुमारे 130 कोटी रुपयांच्या नफ्यात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. संस्थेची आर्थिक स्थिती टिकवून ठेवण्यासाठी सर्व संचालक एकत्रितपणे निर्णय घेतील, असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, 24 कोटी रुपयांचा तोटा नेमका कोणत्या कारणांमुळे झाला, याचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना व्यवस्थापकीय संचालक आणि अकाउंटंट यांना देण्यात आल्या आहेत. पुढील आठवड्यात हा अहवाल संचालक मंडळासमोर ठेवला जाणार आहे. पशुखाद्य, कच्च्या मालाच्या किमती, पॅकिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या फिल्म आणि डिझेलच्या वाढलेल्या दरांसह विविध बाबींचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर तोट्याची कारणं स्पष्ट होतील आणि आवश्यक निर्णय घेतले जातील, असं राजेश पाटील यांनी सांगितलं.

एक ते दोन दिवसांत दूध दरवाढीबाबत निर्णय घेतला जाईल - राजेश पाटील 

या बैठकीत मुंबईतील दूध विक्रीच्या दरवाढीचाही विषय चर्चेला आला. महाविकास आघाडीच्या 13 संचालकांनी दूध दरवाढीसंदर्भात निवेदन दिलं आहे. सत्ताधारी गटातील 12 संचालक आणि शासन नियुक्त चार संचालकांनीही या विषयावर सकारात्मक निर्णय घेण्याची भूमिका घेतल्याचं राजेश पाटील यांनी सांगितलं. मुंबईतील वितरक आणि मार्केटिंग अधिकाऱ्यांशी चर्चा करून एक ते दोन दिवसांत दूध दरवाढीबाबत निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. मुंबईत अमूल आणि मदर डेअरीने दुधाचे दर वाढवले आहेत. गोकुळचा ब्रँड मुंबई आणि पुण्यासारख्या बाजारपेठांमध्ये महत्त्वाचा असल्याचं सांगत दरवाढीनंतरही विक्रीवर परिणाम होणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ग्राहकांचा गोकुळच्या दुधाच्या गुणवत्तेवर विश्वास असल्याचंही ते म्हणाले. त्यामुळे दूध दरवाढीचा निर्णय घेताना वितरक, ग्राहक आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला जाणार आहे.

दरम्यान, गोकुळच्या निवडणुकीदरम्यान दोन्ही आघाड्यांनी जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांवरही बैठकीत चर्चा झाली. दोन्ही आघाड्यांच्या प्रमुखांना विश्वासात घेऊन सर्व 29 संचालक एकत्रितपणे निर्णय घेतील, असं राजेश पाटील यांनी सांगितलं. ग्राहकांच्या आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यावर भर दिला जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दूध उत्पादकांना दूध दरवाढीबाबतची माहिती बुधवार किंवा गुरुवारपर्यंत दिली जाईल, असंही त्यांनी सांगितलं. सर्व संचालकांना विश्वासात घेऊन हा निर्णय जाहीर केला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. बैठकीत विरोधी गटाच्या 13 संचालकांनी सर्व विषयांवर शांततेत चर्चा करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांनी आभार मानले. मात्र, पहिल्याच बैठकीत खुर्च्यांवरून झालेला वाद, 24 कोटी रुपयांचा तोटा आणि संभाव्य दूध दरवाढ या तीन मुद्द्यांमुळे गोकुळच्या पहिल्या बैठकीकडे लक्ष वेधलं गेलं आहे.