Govt Jobs : भारत सरकारच्या कंपनीत नोकरीची संधी, 1 लाख रुपयांहून अधिक पगार

भारत सरकारच्या कंपनीत विविध पदांसाठी भरती सुरु झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 27 नोव्हेंबर आहे. या पदांसाठी पात्रतेचे निकष काय आहेत, जाणून घ्या.

ADVERTISEMENT

POWERGRID Recruitment 2026
POWERGRID Recruitment 2026
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

भारत सरकारच्या कंपनीत नोकरीची संधी

point

काय आहेत पात्रतेचे निकष?

point

पगार किती मिळणार?

POWERGRID Recruitment 2026 : पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामार्फत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. याअंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स (Electronics) शाखेतील एकूण 33 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. सरकारी आणि प्रतिष्ठित सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमात करिअर करू इच्छिणाऱ्या अभियंत्यांसाठी ही एक सुवर्णसंधी असून, पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत.

'असा' करा अर्ज

या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी किमान 60 टक्के गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीची पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे, तसेच त्यांनी GATE 2026 (EC) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवाराचे वय 27 नोव्हेंबर 2026 रोजी किमान 18 वर्षे ते कमाल 28 वर्षांपर्यंत असणे बंधनकारक आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी पॉवरग्रिडच्या www.powergrid.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन 27 नोव्हेंबर 2026 पूर्वी आपले ऑनलाइन अर्ज सादर करावेत.

हे ही वाचा : दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाबद्दल सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, तातडीने पत्रकार परिषद घेत काय म्हणाल्या?

अर्जाचे शुल्क

अर्ज प्रक्रियेसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये न परतावा (non-refundable) शुल्क भरावे लागणार आहे, तर अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), दिव्यांग (PwBD) आणि विभागीय उमेदवारांना या शुल्कातून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी नियुक्त केले जाईल. या प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना 30,000 ते 1,20,000 रुपये वेतनश्रेणीसह महागाई भत्ता (IDA), घरभाडे भत्ता (HRA) आणि मूळ वेतनाच्या 12 टक्के इतर भत्ते दिले जातील.

हे ही वाचा : 33 FD, कोट्यवधीचा बँक बॅलन्स; चंद्रकांत पाटील यांची संपत्ती किती?

ट्रेनिंगनंतर पगार किती मिळणार?

एक वर्षाचा प्रशिक्षण कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना सहाय्यक अभियंता (Assistant Engineer) या पदावर कायम केले जाईल. या पदासाठी 30,000 ते 1,20,000 रुपये (IDA) अशी आकर्षक वेतनश्रेणी असून उमेदवारांना वार्षिक सुमारे 14.33 लाख रुपये इतके पॅकेज (CTC) मिळणार आहे. त्यामुळे पात्र अभियांत्रिकी पदवीधरांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता त्वरित अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.