गावातील 22 वर्षीय तरुणाच्या प्रेमात वेडी झाली महिला, नवऱ्याचा केला भयंकर शेवट

एका महिलेचा गावातील 22 वर्षीय तरुणावर जीव जडला. मात्र त्यांच्या प्रेमप्रकरणात पतीचा अडथळा निर्माण होऊ लागला. यातूनच पटना याठिकाणी एक भयंकर कट रचून हत्या करण्यात आली.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

प्रेमसंबंधात नवऱ्याचा अडथळा

point

प्रियकरासोबत मिळून केली हत्या

Crime News : एका तरुणाच्या सनसनाटी हत्या प्रकरणाचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून, ही हत्येची सुपारी देऊन केलेही हत्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. मृत मोहम्मद इरफान इमाम उर्फ कल्लू याची पत्नी आणि तिच्या प्रियकराने मिळून हा कट रचला होता. 10 नोव्हेंबर रोजी घरात घुसून कल्लू यांची गोळी झाडून हत्या करण्यात आल्यानंतर संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली होती. बिहारची राजधानी पटना येथील ही घटना आहे.

गावातील 22 वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध

मृत मोहम्मद इरफान याच्या पत्नीचे गावातीलच करण कुमार (वय 22) या युवकासोबत प्रेमसंबंध होते, आणि पती या नात्याला सतत विरोध करत होता. या विरोधाला कंटाळून पत्नीने आपल्या प्रियकरासह पतीला कायमचे संपवण्याचा निर्णय घेतला आणि मारेकऱ्यांना सुपारी देऊन ही हत्या घडवून आणली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत गुन्हा दाखल केला आणि तपासासाठी एका विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली.

हे ही वाचा : दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाबद्दल सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, तातडीने पत्रकार परिषद घेत काय म्हणाल्या?

तिघांना अटक

तांत्रिक तपास आणि घटनास्थळावरील पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी मृत पत्नीची कसून चौकशी केली असता या संपूर्ण हत्याकांडात तिचाच सहभाग असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी याप्रकरणी मृतक पत्नी, तिचा 22 वर्षीय प्रियकर करण कुमार आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली असून या गुन्ह्याची उकल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हे ही वाचा : 33 FD, कोट्यवधीचा बँक बॅलन्स; चंद्रकांत पाटील यांची संपत्ती किती?

इतर आरोपी कोण?

या हत्याकांडात अजूनही काही आरोपी सामील असल्याची माहिती समोर आली असून, पोलीस त्यांच्या शोधासाठी विविध ठिकाणी छापेमारी करत आहेत. तसेच, या गुन्ह्यात वापरण्यात आलेले हत्यार जप्त करण्यासाठी आणि हत्येमागील इतर सहाय्यकांचा शोध घेण्यासाठी पोलीस कसून तपास करत आहेत.