Maharashtra Weather : पुढील काही तास महत्त्वाचे, 'या' जिल्ह्यांत मध्यरात्री गारवा जाणवणार

Maharashtra Weather : राज्यात सध्या हवामानात बदल जाणवू लागलेला आहे. तसेच दिवसा उन्हाचा चटका जाणवेल आणि मध्यरात्री ते पहाटे गारवा जाणवेल. नोव्हेंबर महिन्यात थंडीची अधिक चाहुल जाणवण्याची शक्यता आहे, अशातच जाणून घ्या एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे..

ADVERTISEMENT

Maharashtra Weather
Maharashtra Weather
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

 राज्यात सध्या हवामानात बदल

point

दिवसा ऊन आणि मध्यरात्री ते पहाटे गारवा

Maharashtra Weather : राज्यात सध्या हवामानात बदल जाणवू लागलेला आहे. तसेच दिवसा उन्हाचा चटका जाणवेल आणि मध्यरात्री ते पहाटे गारवा जाणवेल. नोव्हेंबर महिन्यात थंडीची अधिक चाहुल जाणवण्याची शक्यता आहे. अशातच रविवारी 15 नोव्हेंबर रोजी राज्यातील हवामान कसे असेल हे पुढीलप्रमाणे..

हे ही वाचा : जबरदस्ती दारू पाजली, साडी नेसवून 20 वर्षीय तरुणावर अत्याचार; 19 जणावर गुन्हा

कोकण 

हवामान विभागाने कोकण विभागात मध्यरात्री ते पहाटे गारवा जाणवेल अशी शक्यता वर्तविली, तर ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीवर अशीच स्थिती आहे. 

पश्चिम महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत घाटमाथ्यावर विविध भागांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता आता कमी झालेली आहे. 

मराठवाडा 

मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड आणि परभणी परिसरात कोरड्या हवामानाची स्थिती आहे. 

 हे ही वाचा : 9 वीतील मुलाचा आईवर चाकू हल्ला, स्वत: इमारतीवरून पडून दुर्दैवी मृत्यू

विदर्भ 

विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गोंदिया या भागांत पावसाचा कोणताही अलर्ट वर्तविलेला नाही.