9 वीतील मुलाचा आईवर चाकू हल्ला, स्वत: इमारतीवरून पडून दुर्दैवी मृत्यू

crime news : पोटाच्याच मुलाने आपल्याच आईवर चाकूने हल्ला केला. नंतर इमारतीवरून उडी मारली आणि ज्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आहे.

ADVERTISEMENT

crime news
crime news
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

पोटाच्याच मुलाने आपल्याच आईवर चाकूने केला हल्ला

point

नंतर स्वत; इमारतीवरून खाली कोसळला

point

आरोपी मुलाने इमारतीवरून खाली उडी मारल्याने दुर्दैवी मृत्यू

Crime News : पोटाच्याच मुलाने आपल्याच आईवर चाकूने हल्ला केला. नंतर इमारतीवरून उडी मारली आणि ज्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आहे. हा धक्कादायक प्रकार आसामच्या गुवाहाटी येथील अबीसी परिसरातील आहे. या घटनेनं परिसर पुरता हादरून गेला. 

हे ही वाचा : गेवराई तालुक्यात भीषण दुर्घटना, मोटारसायकल अपघातात हवाई दलातील जवानाचा मृत्यू

आईवर मुलाचा चाकूने हल्ला 

ही दुर्दैवी घटना ज्योतीनगर हेल्दी मिल परिसरातील आहे. मुलाने आपली आई चंद्रनी कलिकावर चाकूने हल्ला केला होता, त्यानंतर महिलेला गुवाहाटी येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. महिला अतिदक्षता विभागात असून तिची परिस्थिती गंभीर आहे. 

आरोपी मुलाने इमारतीवरून खाली उडी मारल्याने दुर्दैवी मृत्यू

या घटनेनंतर आरोपी मुलाने इमारतीवरून खाली उडी मारली. त्यानंतर तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यू नेमक्या कोणत्या स्थितीत झाला हे अद्यापही समोर आलेलं नाही. तसेच त्याने आपल्या आईवर हल्ला का केला हे देखील अस्पष्ट आहे. पोलीस दोन्ही घटनांमागील हेतूचा तपास करत आहेत.

हे ही वाचा : गावातील 22 वर्षीय तरुणाच्या प्रेमात वेडी झाली महिला, नवऱ्याचा केला भयंकर शेवट

या घडलेल्या घटनेमागील नेमकी माहिती अद्यापही समोर आलेली नाही. तरुणाने आईवर हल्ला का केला? तसेच त्याने इमारतीवरून उडी मारून जीवन संपवले, की तो पडला याचा तापस केला जात आहे. या दुर्दैवी घटनेनं परिसर हादरला असून एकच खळबळ उडाली.