चेंजिंग रुममध्ये 18 वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ, कपड्यांच्या शोरुममध्ये काय घडलं?
एका कपड्यांच्या शोरुममधईल चेंजिंग रुममध्ये तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. दिल्लीतील ही घटना असून ही घटना प्रेमप्रकरणाशी संबंधित असल्याचं बोललं जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
चेंजिंग रुममध्ये 18 वर्षीय तरुणीचा मृतदेह
कपड्याच्या शोरुममध्ये घडलं भयंकर
सीसीटीव्हीत काय दिसलं?
Crime News : एका कपड्यांच्या शोरूममधील ट्रायल रूममध्ये शनिवारी (14 नोव्हेंबर) एका 18 वर्षीय तरुणीचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शबनम असे मृत तरुणीचे नाव असून, ती पश्चिम दिल्लीत आपल्या कुटुंबासोबत राहत होती आणि याच शोरूममध्ये काम करत होती. शबनमच्या कुटुंबीयांनी सूरज नावाच्या तरुणावर तिच्या हत्येचा आरोप केला असून, एकतर्फी प्रेम आणि बिघडलेल्या वैयक्तिक संबंधांतून ही हत्या झाली असावी, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. नवी दिल्ली येथील मोती नगर मेट्रो स्थानकाजवळ असलेल्या एका कपड्यांच्या शोरुममध्ये हा प्रकार घडला.
चेंजिंग रुममध्ये काय घडलं?
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, शनिवारी संध्याकाळी शबनमची कामाची शिफ्ट संपण्याच्या वेळी आरोपी सुरज धारदार शस्त्र घेऊन शोरूममध्ये आला होता. बोलण्याच्या बहाण्याने तो तिला शोरूममधील चेंजिंग रूममध्ये घेऊन गेला आणि तिथे तिचा गळा चिरून तिथून पळ काढला. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास शोरूममधील इतर कर्मचारी दुकान बंद करण्याची तयारी करत असताना त्यांना ट्रायल रूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेली शबनम दिसून आली. कर्मचाऱ्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
हे ही वाचा : गोकुळ संघाच्या दूध पहिल्याच बैठकीत मोठा वाद, आता अध्यक्ष राजेश पाटील म्हणाले...
नेमकं कारण काय?
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता, तरुणीच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा आढळून आल्या. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, सुरज हा शबनमच्या ओळखीचा होता आणि पूर्वी त्यांच्यात मैत्री होती; मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यातील संबंध बिघडले होते आणि सूरजने यापूर्वीही तिला मारहाण केली होती.
हे ही वाचा : सोलापूर : लोखंडी पाईपमध्ये चाकू अडकवून तरुणावर सपासप वार, भरदिवसा मोबाईल शॉपीत काय घडलं?
सीसीटीव्हीत काय?
फरार आरोपी सुरजचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलिसांनी विविध विशेष पथके तयार केली आहेत. घटनेचा नेमका क्रम समजून घेण्यासाठी आणि आरोपी पळून गेलेल्या मार्गाचा शोध घेण्यासाठी शोरूमच्या आतील तसेच आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून वेगाने सुरू आहे.
