Govt Jobs : सरकारने जाहीर केली तलाठी पदांसाठी मेगाभरती, काय आहेत पात्रतेचे निकष?
राज्य सरकारने तलाठी पदांची मेगा भरती जाहीर केली आहे. याअंतर्गत एकूण 1,840 पदे भरली जाणा असून अर्ज करण्याची अंतिम मुदत 27 नोव्हेंबर आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
तलाठी पदांची मोठी भरती
काय आहेत पात्रतेचे निकष?
MPSC Talathi Bharti 2026 : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत 'ग्राम महसूल अधिकारी (तलाठी)' या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी मोठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात एकूण 1,840 तलाठी पदांची भरती केली जाणार असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीमुळे राज्यभरातील लाखो नोकरी शोधणाऱ्या तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
शैक्षणिक पात्रता काय?
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणतीही शाखा पदवी (Graduation) असणे आवश्यक आहे. तसेच, वयाची अट 10 ऑगस्ट 2026 रोजी 18 ते 38 वर्षे दरम्यान ठेवण्यात आली आहे. शासकीय नियमांनुसार मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि अनाथ प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत 5 वर्षांची सवलत देण्यात आली आहे. खुला प्रवर्गासाठी अर्ज शुल्क 394 रुपये तर मागासवर्गीय, ईडब्ल्यूएस व अनाथ प्रवर्गासाठी 294 रुपये आणि माजी सैनिकांसाठी 44 रुपये शुल्क आकारण्यात आले आहे.
हे ही वाचा : एक इंजेक्शन अन् 17 वर्षीय प्राचीचा मृत्यू, संतापलेल्या लोकांनी मेडिकलला लावली आग; नेमकं प्रकरण काय?
अर्जाची अंतिम मुदत
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 नोव्हेंबर 2026 असून, परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2026 निर्धारित करण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या भरती प्रक्रियेअंतर्गत पूर्व परीक्षा आगामी वर्षामध्ये म्हणजेच 24 जानेवारी 2027 रोजी घेतली जाणार आहे. उमेदवारांनी विहित मुदतीत आपले ऑनलाइन अर्ज अधिकृत संकेतस्थळावर सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हे ही वाचा : अल्पवयीन मुलीवर हॉटेलमध्ये नेत सामूहिक बलात्कार, ABVP च्या नेत्यासह चौघांना अटक
'इथे' करा अर्ज
या भरतीसंदर्भातील सविस्तर माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि ऑनलाइन अर्जासाठी अधिकृत संकेतस्थळाला (mpsc.gov.in) भेट द्यावी. सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी ही अत्यंत महत्त्वाची संधी मानली जात आहे.
