छठपुजा सुरू असताना लेकीनं खाल्ला प्रसाद, आईनं 4 वर्षांच्या चिमुकलीला संपवलं

crime news : छठपुजेच्या उत्सवादिवशी पोटच्या मुलीने प्रसाद खाल्ल्याने तिच्याच आईने बेदम मारहाण केली. कुटुंबीयांनी तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी आई रीना कुमारीला अटक केली.

ADVERTISEMENT

crime news
crime news
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

प्रसाद खान्याचा हट्ट हट्ट धरल्याने आईची मारहाण

point

उपचारादरम्यान सुहानीचा मृत्यू

Crime News : बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात छठ पुजेचा उत्सव साजरा केला जात आहे. अशातच समस्तीपुरा येथे याच छठपुजेच्या उत्सवादिवशी पोटच्या मुलीने प्रसाद खाल्ल्याने तिच्याच आईने बेदम मारहाण केली. कुटुंबीयांनी तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी आई रीना कुमारीला अटक केली. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यातील 'या' जिल्ह्यांत हुडहुडी भरणार, IMD चा अंदाज घ्या जाणून

प्रसाद खान्याचा हट्ट हट्ट धरल्याने आईची मारहाण

दरम्यान, हा प्रकार पूसा ठाणे क्षेत्रातील मोहम्मदपुर बिरौली गावातील वॉर्ड क्रमांक 12 येथील आहे. राजू पासवानची पत्नी रीना कुमार ही छठपुजेसाठी पकवान आणि प्रसादाची तयारी करत होती. यादरम्यान चार वर्षीय मुलगी सुहानी कुमारी प्रसाद खान्याचा हट्ट करत होती.

उपचारादरम्यान सुहानीचा मृत्यू

आईने प्रसाद खाण्यापासून विरोध केला, मात्र मुलीने प्रसाद खाल्ला. मुलीने प्रसाद खाल्ल्याचे पाहून आई रीना कुमारी रागवली होती. तिने आपल्या पोटची मुलगी सुहानीला बेदम मारहाण केली आणि सुहानी गंभीर जखमी झाली होती. यानंतर आई आणि नातेवाईकांनी तात्काळ एका रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. 

मृत मुलीचे वडील, राजू पासवान यांच्या म्हणण्यांनुसार, कुटुंबातील इतर सदस्य छठ पुजेसाठी घाट बांधण्यासाठी गेले होते. त्याचदरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला होता. कुटुंबात तीन मुले आहेत. सुहानी कुमारी (वय 4), शिवानी कुमारी (वय 7), दीड वर्षांचा मुलगा राजकुमार हे सुहानीच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाची छाया पसरली होती. 

गावकऱ्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती. पूसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी आई रीना कुमारला अटक केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी समस्तीपूर येथील रुग्णालयात पाठवला. 

हे ही वाचा : Astrology : 'या' राशींचे उजळेल भाग्य, 12 राशींचे जाणून घ्या राशीभविष्य

दरम्यान, मृत मुलीचे वडील राजू पासवान यांनी पत्नीला कठोर कारवाईची मागणी केली. तिला कठोर शिक्षा मिळावी यासाठी आपण प्रयत्न करू, असे त्यांनी म्हटले. या घटनेनं संपूर्ण गाव हादरून गेले.