हॉस्पिटलमध्ये घुसून मेहुण्यावर सपासप वार, ICU बाहेरच हत्या, धक्कादायक कारण समोर
पैशांच्या कारणावरून कोटा येथील मेहुण्यांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला. यामध्ये मौलिक जैन याचा मृत्यू झाला. कोटा येथील एका हॉस्पिटलमध्येच ही हत्या झाली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मेहुण्याला दवाखान्यात जाऊन संपवले
नेमका वाद काय होता?
Crime News : कौटुंबिक आर्थिक वादातून एका 39 वर्षीय व्यक्तीची त्याच्याच मेहुण्याने रुग्णालयाच्या आत चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली. ही घटना गुरुवारी (12 नोव्हेंबर) सकाळी घडली आहे. मौलिक जैन असे मृत व्यक्तीचे नाव असून, कपिल जैन असे आरोपी मेहुण्याचे नाव आहे. वडील आपल्या जावयाला म्हणजेच मौलिकला आर्थिक मदत करत असल्याचा संशय कपिलला होता. याच रागातून गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास कोटा येथील एका रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील आयसीयू (ICU) बाहेर दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि या वादाचे रूपांतर रक्तरंजित हल्ल्यात झाले. राजस्थानच्या कोटा शहरातील ही घटना आहे.
छातीवर केले सपासप वार
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वादानंतर संतप्त झालेल्या कपिलने मौलिकच्या छातीत चाकूने सपासप वार केले, ज्यामुळे मौलिकचा जागीच मृत्यू झाला. पतीला वाचवण्यासाठी मौलिकची पत्नी मध्ये पडली असता, कपिलने तिच्यावरही चाकूने हल्ला केला; या झटापटीत तिला किरकोळ दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी कपिल जैन याला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
हे ही वाचा : नागपूर : कुख्यात गुन्हेगाराची भर चौकात निर्घृण हत्या, सिमेंटच्या कुंडीनं ठेचलं डोकं, मेहुण्यावर संशय
वडील जावयाला पैसे द्यायचे म्हणून...
तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, वडिलांकडून मौलिकला पैसे दिले जात असल्याच्या संशयावरून या दोघांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून कलह सुरू होता. यापूर्वी ऑगस्ट महिन्यातही कपिलने मौलिकला फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली होती आणि त्याच्या घरी जाऊन गोंधळ घातला होता, ज्याप्रकरणी पोलिसांनी त्याला शांतता भंग केल्याबद्दल अटकही केली होती. सुमारे महिनाभरापूर्वी कुटुंबातील इतर सदस्यांनी मध्यस्थी करून दोघांमध्ये समेट घडवून आणला होता, मात्र त्यांच्यातील हा वाद पूर्णपणे मिटला नव्हता.
हे ही वाचा : Govt Jobs : भारत सरकारच्या बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, महिन्याला 60 हजारांहून अधिक पगार
आयसीयू बाहेरच हत्या
दरम्यान, मौलिक आणि त्याची पत्नी रुग्णालयात दाखल असलेल्या तिच्या आईला भेटण्यासाठी आले होते; बुधवारी रात्री दुचाकीवरून जाताना स्पीड ब्रेकरवर नियंत्रण सुटल्याने पती-पत्नी खाली पडले होते आणि त्यात सासूच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. दुसरीकडे, रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर आयसीयूबाहेर ही हत्या झाल्याने रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे बंद असल्याचे समोर आले असून, हल्ल्याच्या वेळी सुरक्षा रक्षकांनी वेळेवर हस्तक्षेप का केला नाही, याबाबतही संताप व्यक्त केला जात आहे.
