कल्याणकरांच्या नळाला पाण्याऐवजी किडे-जंतू, रहिवाशांचे आरोग्य धोक्यात

मिथिलेश गुप्ता

17 Nov 2026 (अपडेटेड: 17 Nov 2026, 06:25 PM)

Kalyan News : कल्याण पूर्वे भागातील महात्मानगर आणि रामनगर परिसरात दूषित पाणीपुरवण्याचा गंभीर प्रकार आता समोर आला आहे. नळातून केवळ दूषितच पाणी येत नसून किडे जंतू आढळून येत आहेत, असा दावा स्थानिक रहिवाशांनी केला आहे.

Kalyan news

Kalyan news

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

जलवाहिन्यांतून येणाऱ्या पाण्यात किडे आणि जंतू

point

बाहेरून पाणी विकत घेण्यासाठी तब्बल 60 रुपये पदरमोड 

Kalyan News : कल्याण पूर्वे भागातील महात्मानगर आणि रामनगर परिसरात दूषित पाणीपुरवण्याचा गंभीर प्रकार आता समोर आला आहे. नळातून केवळ दूषितच पाणी येत नसून किडे जंतू आढळून येत आहेत, असा दावा स्थानिक रहिवाशांनी केला आहे. अशातच आता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. केवळ पाणी पिण्यासाठीच नाहीतर जेवणासाठी देखील बाहेरून पाणी विकत घ्यावे लागत आहे. यामुळे आता सामान्य नागरिकांवर पाण्याची खरेदी करण्यासाठी खिशाला ताण पडत आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Mumbai Local Train Crime : प्रवाशांमधील वादातून 53 वर्षीय व्यक्तीवर चाकूने हल्ला, Video व्हायरल

जलवाहिन्यांतून येणाऱ्या पाण्यात किडे आणि जंतू

कल्याण पूर्व भागात महात्मानगर आणि रामनगर परिसरात काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण झाली. संबंधित जलवाहिन्यांतून येणाऱ्या पाण्यात किडे आणि जंतू आढळून आल्याचा आरोप रहिवाशांनी केला. नळ सुरू करतानच पाण्यासोबत किडे बाहेर येत असल्याने हे पाणी यायचे तरी कसे? असा प्रश्न नागरिकांना उपस्थित झाला आहे. 

बाहेरून पाणी विकत घेण्यासाठी तब्बल 60 रुपये पदरमोड 

विशेष बाब अशी की, पाणी पिणे सोडाच, जेवण बनवण्यासाठी देखील पाण्याचा वापर करणे अवघड होऊन बसले आहे, कारण पाण्यात जंतू आणि किडे आढळून येत आहे. बाहेरून पाणी विकत घेण्यासाठी तब्बल 60 रुपये आकारावे लागतात, तसेच याच पैशांतून स्वयंपाकासाठी देखील पाण्याचा वापर करावा लागतो. काही रिक्षाचालक मनोज वाघमारे, भाग्यश्री वाघमारेसह स्थानिक रहिवाशांनी पाण्यातील किडे आणि जंतू दाखवून आपली व्यथा मांडली आहे. 

या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार फोन करून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याची तक्रार स्थानिक रहिवासी मनोज वाघमारे यांनी केली. महापालिकेकडे नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पाणीपुरवठा करण्याची सातत्याने मागणी होत आहे, तर दुसरीकडे स्वच्छ पाणी पिण्यासाठी सामान्यांना पदरमोड करून पाणी देखील विकत घ्यावे लागत आहे. 

हे ही वाचा : नागपूर: ट्युशन क्लासमध्ये महिलेनं विद्यार्थ्यांना पाठवले अश्लील फोटो, व्हिडिओ

यासंदर्भात केडीएमसीच्या जल विभागाचे अधिकारी महेश डावरे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, या समस्येबाबत तीन दिवसांपूर्वी तक्रार प्राप्त झाली होती. जुन्या पाइपलाइनमुळे ही समस्या निर्माण झाली होती. गेल्या काही दिवसांपासून संबंधित ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू होते. आता आजपासून नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.